वीज बिल आकारणीविरोधात कागल तालुक्यातील शेतकरी आक्रमक; महावितरणला आंदोलनाचा इशारा

कागल (प्रतिनिधी): कागल परिसरातील आणि करनूर भागातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या (MSEDCL) अन्यायी वीज बिल धोरणाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. ७.५ HP वरील वीज बिल आकारणीचा निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून, हा निर्णय तात्काळ मागे घेऊन सर्व शेतकऱ्यांना सरसकट वीज बिल माफी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.  याबाबत शेतकऱ्यांनी महावितरणच्या कागल … Read more

कागलमध्ये अज्ञात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

कागल (प्रतिनिधी): कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीटेकडीजवळ असलेल्या हाय व्होल्टेज ट्रान्समिशन टॉवरवर एका अज्ञात महिलेने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज, २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:०० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष गंगाराम तेली … Read more

व्हन्नूरमध्ये निर्माल्यदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामस्थांकडून १०० टक्के निर्माल्यदान; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श व्हन्नूर : जलप्रदूषणाला आळा घालण्याबरोबरच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत, व्हन्नूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या निर्माल्यदान उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामस्थांनी जलप्रदूषणाचे गांभीर्य ओळखून गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी निर्माल्य नदी, ओढे किंवा जलस्रोतांमध्ये न टाकता १०० टक्के निर्माल्यदान करून पर्यावरण … Read more

कागल स्थानकावर सोनं पळवणारी महिला गजाआड; ५.५ लाखांचे दागिने जप्त

कागल (प्रतिनिधी): एसटी बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला कागल पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. संशयित महिलेकडून सुमारे ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम (४ तोळे) सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.  प्रेरणा ऋतिक सकट असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. एसटी बसमध्ये चढताना … Read more

दूधगंगा सहकार डेअरी लिमिटेड कागलची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

कागल (सलीम शेख): दूधगंगा सहकार डेअरी सोसायटी लिमिटेड, कागल या संस्थेची सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता दूधगंगा सांस्कृतिक भवन, बापूसाहेब महाराज चौक, कागल येथे हसत-खेळत आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. सभेची सुरुवात महापुरुषांच्या आणि श्रीमंत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार … Read more

मुरगूड येथे जैन बांधवांचा ” पर्युषण पर्व ” सोहळा उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) :  मुरगूड येथिल बाजारपेठेतील श्री .जैन श्वेतांबर मंदीरमध्ये श्री.वासुपूज्य भगवान काच मंदीर म्हणजे मुरगूड परिसरामध्ये सुंदर , कलात्मक , नाविन्यपूर्ण मंदिर म्हणून ओळखले जाते.       पर्युषण पर्व हा जैन धर्मातील पवित्र आणि आध्यात्मिक असा सण मानला जातो.    हा सोहळा थाटामाटाचा किंवा मनोरंजनाचा सण नसुन तो आत्मशुध्दी , आत्मपरीक्षण , संयम , … Read more

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील  वंचित  लाभार्थ्यांना  ६६ कोटी ५७ लाखाचा  निधी मंजूर – माजी खासदार संजय मंडलिक

मुरगूड (शशी दरेकर) – मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत राज्यातील अनुदानाअभावी प्रलंबीत असलेल्या  पात्र लाभार्थ्यांना  ६६ कोटी ५७ लाख रुपयाचा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजने अंतर्गत मंजूर झाल्याची माहिती   माजी खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी दिली.      सातत्याने याप्रश्नी केलेल्या  पाठपुराव्यास यश आले असून २०२६-२७ सालासाठी पहिल्या टप्यातील हा निधीसाठी सातत्याने पाठपुरा केल्याचे समाधान  सांगत … Read more

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट – अध्यक्ष नवीद मुश्रीफ

कारखान्याच्या १३ व्या गळीताचा बॉयलर प्रदीपन उत्साहात बेलेवाडी काळम्मा, दि. २०: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे या गळीत हंगामात ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले. कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी अत्याधुनिक प्रदूषण नियंत्रण संयंत्राचा प्रारंभही … Read more

पेठेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ” श्री साईबाबा गणेश तरुण मंडळाच्या” रक्तदान शिबिरास उस्पूर्त प्रतिसाद

सुमारे ७० रक्तदात्यांनीं केले रक्तदान मुरगूड ( शशी दरेकर ) : सामाजिक बांधिलकी जपत मुरगूड ता . कागल येथिल श्री साईबाबा गणेश तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास नागरिक, युवक तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात … Read more

गणेश विसर्जनाच्या दिवशी टोमॅटोमध्ये दिसले गणरायाचे रूप

पाहण्यासाठी भाविकांची गर्दी मुरगूड ( शशी दरेकर ) : गणेश विसर्जनाच्या दिवशी सूर्यवंशी कॉलनी मुरगूड येथील सूरज उर्फ बंटी गवाणकर यांच्या परसबागेतील टोमॅटोमध्ये चक्क गणरायाचे रूप दिसून आल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.     आज सकाळी नेहमीप्रमाणे सूरज गवाणकर हे परसबागेतील भाजीपाल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना टोमॅटोच्या फळावर गणरायाच्या मुखासारखी आकृती दिसून आली. … Read more

error: Content is protected !!