बातमी

विश्वरत्न डॉ बाबासाहेबांनी निर्मीलेल्या राज्यघटनेमुळे भारत देश जगात सन्मानाने मिरवतो आहे – प्रविण सुर्यवंशी

मुरगूड ( शशी दरेकर ) – देशाच्या जडण घडणीत बाबासाहेबांचे योगदान खुप मोठे आहे . याचे साऱ्यांनी भान ठेवणे गरजेचे आहे .बहुजन समाजाचा श्वास आणि घास हा बाबासाहेबांमुळे सुखाचा झाला आहेअसे प्रतिपादन वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांनी केले . ते येथील शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगूड च्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती प्रसंगी बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.डी. माने हे होते . तर जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे कार्यवाह आण्णासो थोरवत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

     विश्वरत्न बाबा साहेब आंबेडकरांच्या प्रतिनेचे पुजन आण्णासो थोरवत यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विजयमाला मंडलिक गर्ल्स स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा पाटील, शोभा पाथरवट, सुरेखा माने,कलावती म्हेतर, गीता शिंदे, जयश्री लोकरे, दिपाली सणगर, शिल्पा पाटील, रोहीणी भाट, सारीका वंदुरे , वैशाली कांबळे, सोनाली शिंदे , स्वाती पाटील, सरिका कुंभार तसेच प्रा. शिकलगार, प्रा. मेटकरी , संदीप सावर्डेकर कृष्णात करडे, बाबुराव जाधव आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक निलेश चौधरी यांनी तर आभार आर ए जालिमसर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *