बातमी

विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

गोकुळ शिरगाव,ता.१४ : कणेरी (ता.करवीर) येथील कणेरी मठावर असलेल्या दत्तू पाटील मळ्यामध्ये असलेल्या तलावानजीक विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी गेलेल्या महावितरणच्या कामगाराचा विद्युत झटका लागल्याने जागीच मृत्यू झाला. यशवंत बाबू जाधव (वय. 53 रा. वन्नाळी ता. राधानगरी जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. जाधव यांची कणेरी गावामध्ये सहा महिन्यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती.

अचानक फोन आल्यानंतर जाधव कनेरी मठावरती विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी गेले होते. काम सुरू असतानाच अचानक कोणीतरी ओरडल्याचा आवाज झाला नाही तेथील शेतामधील असणाऱ्या कामगारांचे लक्ष गेल्यानंतर शॉक लागल्याचे निदर्शनात आले. जोरात विद्युत धक्का लागणारे जाधव हे विद्युत वाहिनील चिकटून बसलेले होते. यानंतर महावितरण ला सांगून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यांना खाली काढण्यात आले व तात्काळ छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडे हलवण्यात आले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सीपीआरमध्ये महावितरणच्या कामगारांनी मोठी गर्दी केली होती.

एका महिन्यापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. अशातच नीतीने त्यांच्यावर दुसरा घाला घातला. त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे आई पत्नी मुलगा आणि मुलगी असे कुटुंब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *