व्हनाळी (सागर लोहार) : केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि. या कारखान्याच्या सभासदांना 30 किलो 13 रूपये प्रति किलो प्रमाणे केमिकल फ्री जॅगरी पावडर (गुळपावडर) देण्याचा निर्णय अन्नपुर्णा कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती अन्नपुर्णा चे संस्थापक चेअरमन, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दिली. पहिल्या टप्यात सन 2016 ते 31 मार्च 2019 पर्यंत शेअर्स खरेदी केलेल्या सभासदांना यंदा संक्रातीनिमित्त सदर योजनेचा लाभ दिला जाणार आहे यामुळे सभासदांची संक्रात गोड होणार आहे.
7 मार्च 2021 रोजी अन्नपुर्णा कारखान्याचा ट्रायल सिझन घेण्यात आला. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वावर व कर्तृत्वावर प्रचंड विश्वास दाखवत सभासदांनी शेअर्स खरेदी केले आहेत. या सभासदांच्या व ऊसउत्पादकांच्या विश्वासहर्तेमुळेच 9 आक्टोंबर 2021 रोजी पुर्ण क्षमतेने पहिला गळीत हंगाम चालू झाला. आज अखेर इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस बीले वेळेत देवून कारखान्याने ऊसउत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
सभासदांना गुळ पावडर (जॅगरी) देण्याच्या या योजने बाबत अधिक माहिती देताना श्री घाटगे पुढे म्हणाले, सभासदांना ही जॅगरी पावडर कारखाना कार्यस्थळावर दिली जाणार असून प्रतिसभासद 30 किलो चे पॅकिंग 13 रूपये प्रतिकिलो दराने मिळणार आहे. नवीन वर्षे तसेच मकर संक्रातीनिमित्त सभासदांसाठी विशेष योजना आमलात आणली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढील वर्षीपासून सर्वानांच…
संजयबाबा घाटगे म्हणाले, या वर्षी पासून पहिल्या टप्यात 2016 ते 2019 पर्यंतच्या सभासदांना केमिकल फ्री जॅगरी पावडर देणार असून पुढील वर्षापासून सर्वच सभासदांना हा लाभ दिला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.