बातमी

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ” जागर मायबोलीचा ” कार्यक्रम उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित आयोजित केलेला ” जागर मायबोलीचा ” हा कार्यक्रम उसाहाच्या वातावरणात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जून कुभार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी होते. तर विचारपीठावर प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे, ज्येष्ठ साहित्यिक भैरवनाथ डवरी उपस्थित होते.

प्रारंभी महाविद्यालयाचे संस्थापक खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पाहार घालून अभिवादन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.डाॅ. शिवाजी होडगे यांनी स्वागत व प्रास्ताविकातून कार्यक्रम आयोजित करण्या मागचा हेतू विषद केला.

श्री. रणजित कदम मुरगूड, सौ . प्रगति कुंभार गारगोटी, श्रीमती नीता कोळी कोल्हापूर या गायकांनी, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे… ही गुलाबी हवा वेड लावी जीवा … अधिर मन झाले… राजा ललकारी अशी दे … गारवा वाऱ्यावर भीरभीरतो पारवा … दृष्ट लागण्या जोगे सारे … विठू माउली तू माऊली जगाची … अश्वीनी ये ना .. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा … आदी भावगीत, भक्तीगीत, लावणी, अशा प्रकारची अनेक बहारदार गाणी गाऊन तब्बल दोन तास श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले.

यातील अश्वीनी ये ना …… हे व्दंव्द गीत रणजित कदम आणि श्रीमती कोळी यांनी गाईले. प्रेक्षक देहभान विसरले आणि अक्षरशः या द्वंव्द गीताच्या तालावर सर्वानीच ठेका धरला. तर प्रगति कुंभार यांनी गाईलेल्या, मला जावू द्या ना घरी आता वाजले की बारा या गाण्याने अक्षरशः धमाल उडविली तरुनाईची पावले तर थिरकलीच शिवाय श्रोत्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून सेवा ज्येष्ठ ग्रंथपाल प्रा. टी. एच. सातपुते, मंडलिक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सद्या या महाविद्यालयामध्ये सेवेत असलेले प्रभारी कार्यालयीन अधिक्षक महादेव भोई, ग्रंथालय परिचर सर्वश्री सुमीत जाधव, सुनिल कडाकणे यांचा संस्थेच्या वतीने नागरी सरकार करण्यात आला. प्राचार्य डॉ. कुंभार यांनी यावेळी अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेचे महत्व विषद केले.

ते म्हणाले मायबोली म्हणजे आईची भाषा अमृताचा गोडवा कुणी अनुभवला नाही किवा त्याची चवही कुणी चाखली नाही. पण मायबोलीतील गाईलेली गाणी ऐकूण कान तृप्त होतात. मराठी भाषा टिकली पाहिजे तिच्या संवर्धनासाठी सार्‍यानी एकवटले पाहिजे असे आवाहनही प्रा.डॉ. कुंभार यांनी यावेळी केले.

दादोबा मंडलिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला वृक्षमित्र प्रविण सूर्यवंशी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.टी. एम. पाटील, डॉ उदय शिंदे, डॉ. महादेव कोळी, डॉ. सौ. माणिक पाटील, डॉ एस बी पोवार, प्रा.सर्वश्री विठ्ठल कांबळे, पांडुरग सारंग , पी आर फराकटे, सूरज मांगले, रणजित पाटील, स्वप्निल मेंडके, डी व्ही गोरे, संदिप वाडीकर कागल, सुशांत पाटील आदी मान्यवरांसह प्रशासकीय सेवकवृंद, विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संखेने उपस्थित होते. सूत्र संचलन प्रा. संदिप हेरवाडकर यांनी केले तर आभार विनायक माने व प्रा. रणजित पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *