बातमी

साके येथे विहिरीत बुडून बैलाचा मृत्यू

वैरणीसह छकडा कोसळला ; सुदैवाने शेतकरी बचावला

व्हनाळी(सागर लोहार): साके तालुका कागल येथे भैरवनाथ देवालय रोड वरील शामराव पाटील यांच्या रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत वैरणीसह एका ( छकडा) सुमारे पंचवीस फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्यामुळे बैलाचा गुदमरून पाण्यात जागीच मृत्यू झाला. सुदैवानं यामध्ये बसलेले शेतकरी जयवंत पाटील व त्यांच्या मित्राचा मुलगा रोहन हे दोघे बचावले.

याबाबत अधिक माहिती अशी साके येथील ढवण यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू होती नेहमीप्रमाणे जयवंत पाटील हे जनावरांना वैरणीसाठी ऊसतोड करण्यासाठी गेले यावेळी त्यांचा मित्र सत्यम पाटील हे देखील वैरणीसाठी ऊस तोडण्यासाठी आला होता. यावेळी जयवंत पाटील यांनी सत्यम यांचा एक्का आपल्या स्वतःचा बैल आणून घरी वैरण सोडण्यासाठी जात असताना शामराव पाटील यांच्या विहिरीजवळ बैल घाबरल्याने वैरणीने भरलेला छकडा बैलासह सुमारे 25 फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळला यामध्ये बैलाचा गुदमरून पाण्यात मृत्यू झाला तर सुदैवाने जयवंत व रोहन या दोघांचा यामध्ये जीव बचावला यामध्ये या शेतकऱ्याचे सुमारे लाख रुपये नुकसान झाले.

One Reply to “साके येथे विहिरीत बुडून बैलाचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *