बातमी

मांगोली येथील पी. जी. पाटील फांऊडेशनचा विद्यार्थी ” अरिंजयसिंह भोसले ” राज्यात प्रथम

मुरगूड (शशी दरेकर) : मांगोली ता. राधानगरी येथील पी .जी. फाऊंडेशनचा विद्यार्थी सातारा सैनिक स्कूल प्रवेश परिक्षेत कु . ” अरिंजयसिंह भोसले ” हा राज्यात प्रथम आणि देशात३९ व्या रँकने यशस्वी झाला. या यशाने मांगोली हे गांव महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तापूर्ण यादीत अग्रक्रमावर आले आहे.

या निमित्ताने राधानगरी, भुदरगड तालूक्याचे माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते कु. अरिंजयसिंह भोसले या विद्यार्थाचा सत्कार व प्रा. श्री अजित पाटील आणि सौ. विद्या अजित पाटील या उभयतांचा कृतज्ञपूर्वक सन्मान करण्यात आला.

यावेळी के. पी. पाटील यानी प्रा. अजित पाटील यांच्या दर्जेदार शैक्षणिक कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करुन मांगोली या छोट्याशा गावाचा नावलौकिक वाढला आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे. असे गौरवोदगार यावेळी त्यांनी काढले.

सदर कार्यक्रम मांगोली येथील पी. जी. पाटील फाऊंडेशनच्या सभागृहात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास मा. श्री. पी. जी. पाटील, श्रीकांतराव भोसले, राजेंद्र पाटील, के. के. पाटील, विरेंद्रसिंह भोसले, विद्यार्थी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *