बातमी

मंडलिक साखर कारखाना निवडणूक २१ जागासाठी ५८ उमेदवारी अर्ज

सर्व अर्ज मंडलिक गटानेच भरल्याने बिनविरोध चा मार्ग मोकळा ; आता लक्ष छाननी व माघारीकडे

मुरगूड (शशी दरेकर) : लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ३९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले तर काल १९ जणांनी अर्ज भरले होते त्यामुळे २१ जागासाठी एकूण ५८ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. २९ मे ला अर्जाची छाननी होणार आहे . विरोधकानी अर्ज दाखल केले नसल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उमेदवारी दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी उत्पादक गटातून ३८ संस्था गटातून २, अनुसूचित जाती जमाती मधून २, महिला गटातून ९, व इतर मागास गटातून ५, भटक्या विमुक्त गटातून २ , संस्था गटातून २ अशा एकूण ५८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांमध्ये आजी माजी संचालक, संचालिका, तसेच काही नव्या चेहर्‍यांनीही अर्ज दाखल केले आहेत. आता लक्ष उमेदवारी छाननी व माघारीकडे लागले असून संचालक मंडळची माळ कोणा कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्स्तुकता लागली आहे.

मुरगूड, बोरवडे, कागल, मौजे सांगाव, सेनापती कापशी अशा ५ उत्पादक गटातून प्रत्येकी ३ व एकूणा १५ संचालक तसेच इतर मागास वर्गातून १, भटक्या विमुक्त गटातून १, महिला गटातून २ व संस्था गटातून १ असे २१ संचालक निवडून द्यायचे आहेत. कागल तहसील कार्यालयात निवडणूक कार्यालय असून निवडणूक निर्णय अधिकारी कागल – करवीरचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कागलचे सहाय्यक निबंधक संभाजी पाटील, ए. पी. खामकर,अमर शिंदे हे काम पाहत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *