मुरगूड ( शशी दरेकर ) – “स्व. विश्वनाथराव पाटील यांच्या घालून दिलेल्या तात्विक बैठकीवर संस्था आर्थिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, ऊस उत्पादक, आणि लहान व्यावसायिक हा संस्थेचा मुख्य आधार आहे. त्यांच्या श्रमाच्या प्रत्येक रुपयाची संस्था विश्वस्त या नात्याने काळजी घेण्यास बांधील आहे. सभासद या संस्थेस आपली आई मानतो 75 वर्षानंतरही हीच सदिच्छा कायम ठेवण्यास बँक व्यवस्थापन यशस्वी झाले आहे.” असे गौरव उदगार प्रवीणसिंह पाटील यांनी काढले.
विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या 75 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी ते बोलत होते. 75 व्या वर्षी बँकेकडे 68 कोटी आठ लाखाच्या ठेवी असून 42 कोटी 66 लाखाचे कर्ज वितरण केले आहे. बँकेचा निव्वळ नफा 44 लाख 30 हजार इतका आहे.बँकेने सतत ऑडिट वर्ग अ प्राप्त केले. 11 टक्के डिव्हिडंड सभासदांना दिला आहे अशी माहिती त्यानी दिली.
यावेळी विद्यार्थी गुणवत्ता पारितोषिक, आणि अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे नियोजन, सभासदांना आकर्षक भेटवस्तू प्रदान करणे याविषयी यासह इतर अनेक आयत्यावेळीच्या विषयावर चर्चा झाली. सभासदांनी विविध 10 विषयांना एकमताने मंजुरी दिली.
सी आर माळवदे, प्रा. चंद्रकांत जाधव, मनाजी सासने, दत्तात्रय तांबट, जगन्नाथ पुजारी, संजय मोरबाळे शिवाजी सातवेकर
यांनी सहभाग घेतला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वासराव चौगले यांनी नोटीस, प्रोसिडिंग व अहवाल वाचन केले. शाखा अधिकारी विजय शेट्टी यांनी ऑडिट मेमो वाचन केले. सूत्रसंचालन ए. एन. पाटील तर आभार बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी मानले.
प्रारंभी ज्येष्ठ सभासद नामदेवराव कापसे यांच्या हस्ते सहकार सहकार रत्न विश्वनाथराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. बँकेचे संचालक नंदकुमार ढेंगे,एकनाथ मांगोरे, विठ्ठलराव भारमल, संतोष वंडकर, बाळासो पाटील, सुधीर सावर्डेकर, वासुदेव मेंटकर, गणपतराल लोकरे, रेवती सुर्यवंशी, लक्ष्मी जाधव,
नामदेव करडे,पांडुरंग चांदेकर,शिवाजी सातवेकर, बाजीराव देवळे,दत्तात्रय तांबट, आनंदराव कल्याणकर,बाबुराव कांबळे, ऍड बजरंग मसवेकर, विनय पोतदार, मारुती कांबळे, सुखदेव वरपे, नंदकुमार दबडे, बाजीराव सोनुले, सुहास घाटगे, किशन कोंगनुळे, मारुती घाटगे , विजय चौगुले आदी उपस्थित होते.