बातमी

सुरुपलीच्या हनुमान सेवा संस्थेत सत्तांतर

विरोधी गटाचे १० उमेदवार विजयी तर सत्ताधारी गटाला केवळ २ जागावर विजय मुरगूड ता. १९ (प्रतिनिधी) : सुरुपली ता.कागल येथील हनुमान सेवा सोसायटीच्या अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणूकीत रंगराव पाटील, एस. आर. बाईत, राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील श्री भावेश्वरी शेतकरी विकास आघाडीने १२ पैकी १० जागावर विजय मिळवत संस्थेत सतांतर घडवले सत्ताधारी गटाला केवळ दोन जागावर […]

बातमी

राजकारणामुळे गावातील यात्रांचा बोजवारा

कागल (कृष्णात कोरे) : गेल्या तीन वर्षा पासून सर्वत्र कोरोना महामारीची लाट पसरली. सार्वजनिक उत्सव- यात्रा- म्हाई बंद झाले. शौकिनांच्या उत्साहावर पाणी फिरले. आता कुठे कोरोणा- महामारी मागे फिरली आहे तर पुन्हा यात्रा – म्हाई – सार्वजनिक कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रत्येक गावा-गावातील म्हाई- यात्रा म्हणजेच त्या गावातील ग्रामीण परंपरेचा वसा जपण्याचेच काम असते. […]

बातमी

अमित धोंडिराम मगदूम याला पीएच. डी. पदवी प्रदान

सिद्धनेर्ली : पिंपळगाव खुर्द ता कागल येथील अमित धोंडिराम मगदूम याला पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. अभियांत्रिकीमधील राष्ट्रीय प्रौध्योगिकी संस्थान (एन.आय.टी) गोवा मधून “रेग्युलरायझेशन टेक्निक अॅण्ड डीप न्यूरल नेटवर्क फॉर द सोल्युशन ऑफ इन्व्हर्स प्रॉब्लेम्स इन मायक्रोव्हेव इमेजिंग ” या विषयातील शोध प्रबंधावरती पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना संस्थेचे प्राध्यापक डॉ. मल्लिकार्जुन […]

कृषी बातमी

उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादन : राज्यातला पहिलाच प्रयोग कोल्हापूरात यशस्वी

जागतिक स्तरावर पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादनाचा प्रयोग कशा पध्दतीने राज्य स्तरावरील पहिलाच प्रयोग ठरला याची ही यशोगाथा..  कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग अर्थात शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यामधे पूर्वापार खरीप हंगामात नाचणीचे पीक घेतले जाते. पुर्वीच्या काळी नाचणी पिकवणा-या प्रत्येकाच्या […]

बातमी

हुपरी नगरपरिषद मार्फत महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

रणदेवीवाडी (शिवाजी फडतारे) : जागतिक महिला दिन निमित्त हुपरी नगरपरिषद मार्फत सोमवार दि. २० मार्च रोजी दुपारी ३ वाजता महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती हुपरी नगरपरिषदेने दिली आहे. सदर स्पर्धांमध्ये उखाणे, संगीत खुर्ची, टाकाऊ पासून टिकाऊ बनवणे, लिंबू चमचा स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच ‘महिला आरोग्य’ विषयावर डॉ. प्राची घुणके, सौ.सुजाता […]

बातमी

मंडलिक महाविद्यालयात उद्या होणार ‘जोडीदाराची विवेकी निवड’ संवाद कार्यशाळा

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा-मुरगुड व सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय विवेक वाहिनी विभाग मुरगुड यांच्या वतीने शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी मंडलिक महाविद्यालयात ”जोडीदाराची विवेकी निवड”संवाद कार्यशाळा संपन्न होणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा-मुरगुडचे युवा विभाग प्रमुख विकास सावंत यांनी गहिनीनाथ समाचारशी बोलताना दिली.हा कार्यक्रम प्राचार्य डॉ […]

लेख

कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प

महाराष्ट्र राज्याचा २०२३-२४ वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधानपरिषदेत मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सादर केला. राज्याच्या या अर्थसंकल्पात ५ लाख ४७ हजार ४५० कोटींची तरतूद करण्यात आली असून हा अर्थसंकल्प ‍कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा आहे. काजू बोंडावर प्रक्रिया केंद्र- काजू […]

बातमी

कागल एमआडीसीमध्ये वीज पडल्याने बगॅसला आग

पन्नास लाखांचे नुकसान कागल (प्रतिनीधी) : कागल पंचतारांकित एमआयडीसीतील – ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बग्यास डेपोमध्ये पहाटे तीनच्या सुमारास वीज पडल्याने आग लागली. १४५७ मॅट्रिक टन बगॅस जळून खाक झाला आहे. सुमारे ५० लाखाहून अधिक रकमेचे यामध्ये नुकसान झाले आहे. डाव्या कालव्या शेजारी खासगी माळावर सुमारे ३० एकर परिसरात या कंपनीचे बगॅसचे ३५ डेपो […]

बातमी

ईडीने चांगले सहकार्य केले व ईडीलाही अतिशय योग्य चांगल्या पद्धतीने उत्तरे देऊन सहकार्य केले – आम. हसन मुश्रीफ

सोमवारी दि. २० रोजी १२.३० वाजता पुन्हा बोलविले आहे मुंबई, दि. १५ : आज बुधवार दि. १५ रोजी दुपारी १२.३० वाजता ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर झालो. सव्वाआठ तासांच्या चौकशीत अतिशय योग्य व चांगल्या पद्धतीने उत्तरे देऊन चौकशीला सहकार्य केले आहे. सोमवारी दि. २० दुपारी १२.३० वाजता पुन्हा बोलविले आहे. त्यावेळीही चौकशीला हजर राहून सहकार्य […]

बातमी

हुपरी न.पा. चा विकास आराखडा प्रसिद्ध

हुपरी : बहुचर्चित हुपरी शहराचा प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. तो पालिका, नगररचन विभाग (कोल्हापूर), मंडल अधिकारी व नगर भूमापन कार्यालय येथे पाहायला उपलब्ध असून, त्यावरील नागरिकांच्या सूचना हरकत आराखड्याची सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यावर ३० दिवसांच्य आत विचारात घेतल्या जाणार आहेत. शहरातील मोकळ्या जागा तसेच शेतजमिनी यावरील आरक्षणाच प्रारूप विकास आराखड्यात समावेश असून, […]