पैशाचे पाकीट ज्येष्ठ नागरिकाला वडाप वाहतूकदाराने केले प्रामाणिकपणे परत

मुरगूड ( शशी दरेकर ): यमगे ता. कागल येथील वडाप वाहतूक व्यावसायिक सुधाकर महादेव हुल्ले यांनी आदमापुर येथील बाळूमामा दर्शनासाठी आलेल्या जगन्नाथ नरहरी तळेकर वय ८९ रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा यांना त्यांचे गहाळ झालेले पाकीट प्रामाणिकपणे परत दिले.         काल रात्री ७ वा. देवदर्शनासाठी आलेल्या जगन्नाथ तळेकर यांना  मुधाळ तिट्ट्यावरून आदमापूर येथे वडाप व्यावसायिक … Read more

Advertisements

जोतीराम गोपाळराव सूर्यवंशी – पाटील यांनी घेतले १० टीबी पेशंट दत्तक

मुरगूड ( शशी दरेकर ) : मा. जिल्हाधिकारी,कोल्हापूर श्री.अमोल येडगे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, तालुका आरोग्य अधिकारी, कागल डॉ.फारूक देसाई यांनी यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत  “निक्षय मित्र” होऊन  क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करणेबाबत आवाहन केले आहे, या आवाहनास प्रतिसाद म्हणून मुरगूड येथिल श्री. जोतीराम गोपाळराव सूर्यवंशी यांनी संमती दिलेल्या १०  क्षयरुग्णांना … Read more

मुरगूडच्या ओंकार पोतदार यांना राज्यस्तरीय गुरुवर्य युवारत्न  पुरस्कार जाहीर

मुरगूड ( शशी दरेकर ) : गुरूवर्य सेवा प्रतिष्ठान कोल्हापूर या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुरूवर्य पुरस्कारासाची घोषणा  नुकतीच करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तिंना हा पुरस्कार जाहिर करण्यात येतो. यावर्षी राज्यस्तरीय गुरुवर्य युवारत्न पुरस्कार मुरगुड ता. कागल येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ओंकार पोतदार याना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पंढरपूर, जयसिंगपूर, कोल्हापूर, … Read more

मुरगुड शहरातील मटण मार्केटची दुरावस्था – मुख्याधिकारी यांना निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) : जवळजवळ चार दशके सुरू असलेले मुरगूड मधील मटण मार्केट आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मार्केट मधील दहा गाळ्यांपैकी आता फक्त एखादा दुसरा गाळा सुरू असतो. पाण्याची व्यवस्था पण नाही त्यामुळे विक्रेत्यांना लांबून पाणी आणावे लागते. सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य आहे.त्यामुळे ग्राहक नाके मुरडतात व बाहेरच्या बाहेर निघून जातात.मटण … Read more

कागल मध्ये बेकायदेशीर गोमांस वाहतुकीवर पोलिसांची धाड; जेसीबीने केली विल्हेवाट, सात लाखांचा मुद्देमाल जप्त

कागल (सलीम शेख ): कागल पोलिसांनी बेकायदेशीर गोमांस वाहतुकीवर मोठी कारवाई करत हॉटेल अशोक समोरील बोदग्यातून विनापरवाना गोमांस घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे दोन हजार किलो गोमांसासह एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, हॉटेल अशोकसमोरून बेकायदेशीर गोमांसाची वाहतूक केली जात आहे. या … Read more

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगूडमधे नालेसफाई व ओढ्यांची सफाई

मुरगूड ( शशी दरेकर ): पूरपरस्थिती अगोदर  मुख्याधिकारी अतिश वाळुंज यानीं नागरीकांनी केलेल्या मागणीने नगरपालिका कर्मचारी, समाजसेवकांच्या सहकार्याने ओढे -नाले  स्वच्छ करून घेतल्याने नागरीकात समाधान व्यक्त होत आहे. मुरगूड शहरामधील मुरगूड कुरणी रोडवरील दत्तप्रसाद मंगल कार्यालय येथे नदी पर्यंत असणाऱ्या ओढा आणि नाल्यांची स्वच्छता  नगरपालिका प्रशासनाने करून घेतली .त्यांना मुरगूड मधील सामाजिक कार्यकर्त्यानीं हातभार लावला. … Read more

बाचणी येथे दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापुर बाचणी मार्ग बंद बाचणी (तानाजी सोनाळकर) : दूधगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाचणी-कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे व्हणाली, साके, बेळवले खुर्द येथील वाहतूक ठप्प झाली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. मे महिन्यातच दूधगंगा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा झाली आहे, तसेच पेरणी हंगामातच नदीला पूर आल्याने शेतकरी हवालदिल झाले … Read more

विकासवाडीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साकारणार; आमदार अमल महाडिक यांनी केली पाहणी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासवाडी (ता. करवीर) येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. या नियोजित स्टेडियमच्या जागेची पाहणी आमदार अमल महाडिक यांनी नुकतीच केली. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार स्वप्नील रावडे आणि भूमापन अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर शहरापासून अवघ्या १५ ते २० कि.मी. … Read more

कागल मध्ये तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर तिरंगा यात्रेचे आयोजन

व्हनाळी : देशभरात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर ठिकठिकाणी भारतीय बांधव आणि विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून तिरंगा यात्रा काढून सैनिकांच्या धैर्याला सलाम करण्यात आला.  भारतीय सशस्त्र दलांनी नुकत्याच यशस्वी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सन्मानार्थ कागल येथे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.  या यात्रेंमध्ये माजी सैनिक, विविध मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  कागल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज … Read more

कागलमध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात संपन्न

कागल (सलीम शेख) : दि. १६ मे  राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त कागल शहरात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालय, कागल येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे रुग्णालयात उपस्थित नागरिक आणि रुग्णांना डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हिवताप या आजारांविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी या आजारांची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले. … Read more

error: Content is protected !!