वाय. डी. माने कॅम्पसमध्ये करियर गुईडन्स व प्रवेशसंदर्भातील संपूर्ण माहिती देणेसाठी मध्यवर्ती प्रवेश कक्षाचा शुभारंभ

अद्यावत प्रवेश कक्षात प्रवेशाबाबत संपूर्ण मार्गदर्शन व कॅपचे फॉर्म भरण्याची सोय

कागल : शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य आणि नामांकित संस्था ‘दि कागल एज्युकेशनल सोसायटी’ संचलित वाय. डी. माने एज्युकेशनल कॅम्पस येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘मध्यवर्ती प्रवेश कक्ष’ (Central Admission Cell)चा दि. ०४ जून २०२६ रोजी शानदार शुभारंभ करण्यात आला आहे.

Advertisements

बदलत्या शैक्षणिक प्रवाहात विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या आणि उज्ज्वल भवितव्य घडवणाऱ्या अभ्यासक्रमांची निवड करता यावी, विद्यार्थी आणि पालकांना एकाच छताखाली प्रवेशाविषयी संपूर्ण मार्गदर्शन मिळावी, विद्यार्थी आणि पालकांचा वेळ वाचावा आणि त्यांना अचूक माहिती मिळावी या उद्देशाने हा भव्य ऍडमिशन सेल सुरू करण्यात आला आहे.ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थांसाठी हे केंद्र  फॉर्म भारणेपासून योग्य शाखा निवडण्यापर्यंत खूप उपयुक्त ठरेल.

Advertisements

वाय. डी. माने कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी  १० वी नंतर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांसाठी  प्रवेशासाठी संस्थेमार्फत पॉलिटेक्निक (AIML,Computer, Electrical, & E.TC Engg.) व आय टी आय (Fitter,Electrician, D.Civil ) तसेच १२ वी नंतर फार्मसी (D & B)  व नर्सिंग (ANM,GNM,B.Sc.) सारखे कोर्सेस उपलब्ध आहेत कक्षामध्ये प्रवेशांबाबत सविस्तर माहिती व समुपदेशन (Counselling) दिले जाईल.

विद्यार्थाना सर्व प्रकारची माहिती व विनामूल्य ऍडमिशन फॉर्म भारणेची व्यवस्था कक्षात  करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना योग्य तो करिअर पर्याय निवडण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि समुपदेशक मार्गदर्शन करत आहेत.ऑनलाईन फॉर्म भरणे, कागदपत्रांची पूर्तता करणे आणि शासकीय शिष्यवृत्ती (Scholarship) योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध.

Advertisements

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही संभ्रमात न राहता आपल्या पालकांसह या प्रवेश कक्षाला भेट द्यावी. या ठिकाणी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून अत्यंत पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. अशा या अद्यावत प्रवेश कक्षाचा लाभ कागल व कागल परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थांनी  घ्यावा.असे आवाहन कॅम्पस  डायरेक्टर  सौ शिल्पा पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!