मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड व मुरगूड परिसरात मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडासह शनिवारी दुपारनंतर पावसाने धुवाँधार हजेरी लावली.
गेल्या काही दिवसापासून उकाडयाने हैराण झालेल्या शहरवासीयानां या हमदार पावसामुळे दिलासा मिळाला.

शनिवारी दिवसभर हवेत उष्मा होता. यामुळे नागरीक हैराण झाले होते. अधून -मधून ढगाळ वातावरण निर्माण होते. सायकाळी मात्र हलक्या सरी कोसळत राहिल्या आणि बघता बघता वादळवाऱ्यासह व मेघगर्जनासह धुवाँधार पावसाला सुरुवात झाली . शहरासह परिसरात पावसाला जोरदार सुरुवात झाली या पावसाने वाहनधारक, दुकानदार, पादचारी यांची तारांबळ उडाली.
बाजारपेठेतही काही काळ वाहतूक मंदावली होती. अवघ्या तासाभराच्या धुवाँधार पावसाने हवेत गारवा निर्माण होऊन नागरीकानां दिलासा मिळाला. रविवारी ही सायंकाळी पावसाच्या सरी थोडया प्रमाणात कोसळत राहिल्या.