निढोरीत मेंढपाळ महिलेस अज्ञाताकडून   माराहाण करून  चार लाखाच्या दागीन्यांची लुट

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी – सोनाळी मार्गावर शेतामध्ये मेंढपाळ करणाऱ्या महिलेला रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत  तीचे हात तोंड बांधून माराहाण करीत अज्ञात व्यक्तींनी तिच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफूले असे चार लाख किंमतीचे तीन तोळ्याचे दागीने  हिसकावून पलायन केले. या घटनेसंबंधी सदर महिलेने मुरगूड पोलीसात फिर्याद दिली आहे.

Advertisements

             अधिक माहिती अशी : खडकलाट तालुका  चिक्कोडी येथील मेंढपाळ  महिला सौ लक्ष्मी विठ्ठल गावडे (वय ३५ ) ही निढोरी सोनाळी मेंढपाळ करण्यासाठी तळावर घोडे बांधण्यास जात असताना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात दोन चोरट्यांनी तिच्या डोळ्यावर पटी बांधून  व तोंड दाबून धरत जोरात माराहाण केली यावेळी सदर महिला घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत  होती पण या व्यक्तीनी तीला पकडून ठेवत तीच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागीने हिसकावून काढून घेतले . याचवेळी महिलेने हिसडा मारून शेजारी असणाऱ्या ऊस पिकात धूम ठोकली . दरम्यान या व्यक्तींनींही तेथून काढता पाय घेतला . सदर महिला मात्र घाबरून रात्रभर उसातच लपून बसली तिचा पती विठ्ठल गावडे  व ग्रामस्थांनी रात्रभर शोध घेतला पण ती महिला आढळून आली नाही. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर ही महिला ऊसातून बाहेर आली  त्यानंतर हा  प्रकार उघडकीस झाला.

Advertisements

       माराहाण झालेल्या या महिलेला सकाळी  ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर सदर महिलेने मुरगूड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास धाव घेतली पण  शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत  फिर्याद घेण्यासाठी तिला  पोलीस ठाण्यात ताटकळत  ठेवण्यात आले . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!