डी. आर. माने महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे नेत्रदिपक यश

कागल  : कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथील एन. सी. सी. कॅडेट (बी. कॉम. भाग तीन) ची विद्यार्थिनी कु. श्वेता तानाजी पाटील हिची (women military police) वुमन मिलीट्री पोलीस मध्ये निवड झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

Advertisements

                या उज्ज्वल यशाबद्दल श्वेता आणि तिचे मार्गदर्शक एन. सी. सी. विभाग प्रमुख कॅप्टन प्रा. डॉ. संतोष जेठीथोर यांचे  कौतुक  होत आहे.

Advertisements

           डी. आर. माने महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहमीच वेगवेगळ्या शासकीय पदावर विराजमान होऊन महाविद्यालयाचे नाव देशभरात उज्ज्वल करतात. जिद्द, मेहनत आणि ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न हे यश मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून डी. आर. माने महाविद्यालय, कागलच्या विद्यार्थ्यांकडे पाहिले जाते.

           श्वेताच्या या यशासाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले,  प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम, एन. सी. सी. विभाग प्रमुख कॅप्टन प्रा. डॉ. संतोष जेठीथोर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!