कागल (विक्रांत कोरे) : एकोंडी ता. कागल येथील गणपती काशिनाथ पुजारी (धनगर )यांची आंतरराज्य गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. निवडी संबंधीचे पत्र नुकताच मिळाले आहे.
नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यामार्फत आंतरराज्य पुरस्कार गणपती धनगर यांना प्राप्त झाला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या निवडक व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो .यामध्ये सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात गणपती धनगर यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याचे वितरण शनिवार दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी बेळगाव येथे होणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व माननीय केंद्रीय मंत्र्यांकडून अभिनंदन पत्र, मैसूर फेटा व चंदनाचा कायमस्वरूपी हार असे असणार आहे. त्याचे वितरण महाराष्ट्र व गोवा पुरस्कार वितरण महासंघमार्फत करण्यात येणार आहे. या निवडीने गणपती पुजारी धनगर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.