बातमी

मुरगूडमधील घरगुती गणपती बाप्पाना थाटात निरोप

मुरगूड पोलिस स्टेशनच्या गणपतीची मिरवणूक लक्षवेधी

मुरगूड (शशी दरेकर) -” गणपती बाप्पा मोरया sss पुढल्या वर्षी लवकर या ” च्या जयघोषात गणरायाला मुरगूडकरानी निरोप दिला. कोरोनामुळे गेले दोन वर्षे न झालेली गणेश विसर्जन मिरवणूका या वर्षी पारंपारिक पध्दतीने उत्साहाच्या वातावरणात पार पडल्या. सोमवारी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मुरगूड पोलिस स्टेशनच्या गणरायाची मिरवणूक लक्ष वेधून घेणारी होती .ढोल -ताशांच्या आणि लेझीम पथकामुळे गणेश भक्तानां ठेका धरण्यास भाग पाडले . यामध्ये ठेक्याच्या तालावर पोलिस कर्मचाऱ्यानीही नृत्याविष्कारात सहभाग घेतला.

या गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये सपोनि विकास बडवे , कुमार ढेरे, स्वप्निल मोरे सह सर्व पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. एकंदरीत मुरगूड पोलिस स्टेशनचे सपोनि विकास बडवे यांच्या आवाहनानुसार मुरगूडकरानी गटागटाने व शांततेत, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि मोरयाच्या गजरात भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *