बातमी

कागलकरांनी केल्या १४०० गणेश मूर्ती दान

दिवसभरात १.५ टन निर्माल्य नगरपरिषदेने संकलन

कागल: कागल नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी टीना गवळी यांचे मार्गदर्शनाखाली कागल शहरात 10 प्रभाग मध्ये 12 ठिकाणी गणेश मूर्ती व निर्माल्य स्वीकारणेस पथके तयार करणेत आली होती तरी 12 ठिकाणी साधारण 950 मूर्ती उस्फूर्त पणे नागरिकांनी दान करून पर्यावरण पूरक गणेश विसर्जनास नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.

तसेच नदी काठावर ही जवळ जवळ 355 गणेश मूर्ती नागरिकांनी नगरपरिषदे कडे दान केले आहेत असे मिळून 1350 ते 1400 च्या आसपास मूर्ती नगरपरिषदेने दिवसभरात स्वीकारले आहेत तसेच दिवसभरात 1.5 टन निर्माल्य नगरपरिषदेने संकलन केले आहे या कामी नगरपरिषदेने 12 पथके तयार करून सर्व खात्याचे अधिकारी कर्मचारी नेमले होते तसेच नदीकाठावर अग्निशमन पथक कार्यरत ठेवणेत आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *