बातमी

मुरगूडमधील भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धत इंद्रजित फराकटे प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील नगर परिषदेच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत बोरवडेच्या इंद्रजीत अशोक फराकटे ( बोरवडे, तालूका कागल ) याने प्रथम क्रमांक पटकावला. इंदाजित फराकटे हा बिद्रीच्या दुधसाखर महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. गोकूळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून त्याला सन्मानित करण्यात आले.

नगरपरिषदेच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्याधिकारी व नगरपरिषदेचे अधिकारी, सेवकवृंद, व कर्मचारी संघटना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भ०य खुल्या मॅरेथॉन स्पर्धचे उद्घाटन गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी युवा नेते विश्वजीतसिंह पाटील , माजी उप नगराध्यक्ष सर्वश्री अनंत फर्नांडिस, बजरंग सोनुले तसेच विलास गुरव, डॉ.अशोक खंडागळे, माजी नगरसेवक धनाजीराव गोधडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी बोलताना अध्यक्ष श्री.पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या नगरपालिका आहेत. त्यापैकी आपली मुरगूड नगरपरिषद आहे . वर्धापन दिनाचे औचित्य साधून परिषदेचे अधिकारी आणि सेवकवृंद यांनी जे जे कार्यक्रम राबविले ते सारेच उपक्रमशील, अनूकरणीय आणि कौतूकास पात्र आहेत. त्यांच्या कार्यास सुयश चिंततो असेही अध्यक्ष श्री पाटील म्हणाले.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणचे ५२ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजयी खेळाडू असे : द्वितीय क्रमांक – सुहास सावरतकर (मळगे) ,तृतीय क्रमांक – रोहित जाधव(कोरोची ), चतुर्थ क्रमांक – प्रथमेश गुरव (कोनवडे) व उत्तेजनार्थ पाचवा क्रमांक – विनायक वडर (मळगे बु.) विजयी स्पर्धकांना सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोखीची पारितोषिके आणि सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

स्पर्धत पंच म्हणून प्रा.चंद्रकांत जाधव, कॉम्रेड अशोक चौगले , मदन डवरी यांनी काम पाहिले.

यावेळी एकनाथ बरकाळे , सुशांत मांगोरे, के .डी. मेंडके , सदाशिव गोधडे ,कुमार सावर्डेकर यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेचे प्रकाश पोतदार , जयवंत गोधडे , अमोल गवारे ,रमेश मुन्ने , अमर कांबळे , मारूती शेट्टी , अनिकेत सूर्यवंशी , रणजीत निंबाळकर , सुनील पाटील , विनायक रणवरे, बबन बारदेसकर, भिकाजी कांबळे, प्राजक्ता पिंपळे, रेश्मा चौगले यांच्यासह नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमर कांबळे यांनी केले . तर आभार अनिकेत सूर्यवंशी यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *