कागल( विक्रांत कोरे) : कागल गोष्टी गल्ली येथील न्यू उत्कर्ष फ्रेंड्स सर्कल (भैय्या बाबा माने ग्रुप) यांच्या वतीने गणेश उत्सवाचे अवचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ॲपल सरस्वती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयोजनाने 1ते 4 वयोगटातील लहान मुलांचे आरोग्य तपासणी करण्यात आले. यामध्ये 422 मुलांची तपासणी करण्यात आली. डॉक्टर महेश्वरी जाधव, डॉक्टर नितीन लकारे, डॉक्टर महेंद्र ढोबल व स्टाफ यांनी मुलांची तपासणी केली.
तसेच गणेशोत्सवामध्ये गल्लीतील कुटुंबांना भेटवस्तू देण्यात आली. श्री चंडी होम, कुकुमाचर्न व श्री सुथ पटण, महाआरती, गणेश याग (होम), श्री अथर्वशीर्ष पठण, सूश्राय भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास के. डी. सी. सी बँकेचे संचालक भैय्या माने, प्रवीण काळबर, सुनील माळी, सुधाकर जाधव, विक्रम जाधव, सुनील माने, श्रीमती आशाकाकी माने, मंडळाचे अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष बबलू मुल्ला, सेक्रेटरी अनिल काळे आदींसह नागरिक, ज्येष्ठ नागरिक, मंडळातील सर्व सदस्य, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.