बातमी

२००० कामगांरांची नोंदणी स्वखर्चाने पुर्ण करणार : बाजार समिती संंचालक सचिन घोरपडे यांचा वाघापुरात निर्धार

मडिलगे (जोतिराम पोवार) : आमचे नेते, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या वाढदिवस संकल्पपुर्तीनिमत्य २००० बांधकाम कामगारांची नोंदणी स्वखर्चाने पुर्ण करणार असल्याचा निर्धार बाजार समिती संचालक सचिन घोरपडे यांनी आज बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात बोलताना केला. ते वाघापूर (ता भुदरगड) येथील जोतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या भव्य मेळाव्यात बोलत होते. भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी बोलताना बाजार समिती संचालक सचिन घोरपडे पुढे म्हणाले की सामाजिक दायीत्व म्हणून ही जबाबदारी आंम्ही स्विकारली आहे.आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून या कामाचा लाभार्थ्यांनी पाठपुरावा करावा.
यावेळी बोलताना माजी चेअरमन सदाशिवराव चरापले म्हणाले की, कोरोना काळात वाढदिवस साजरा करायचा नाही असा निर्धार माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी केला होता.त्यास अनुसरून कार्यकर्त्यांनी शासकिय योजना गावागावापर्यंत पोहचवा अशा सुचना केल्या होत्या. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे नेत्याचा हा आदेश मानून कामाला लागले आणि आरोग्य शिक्षणाच्या सेवा देणाऱ्या बांधकाम कामगारांच्या पाठीशी ठाम उभा राहाण्याचा निर्धार केला.सध्याचा शेतकरी राजा वाढत्या महागाईने बेजार झाल्याने तो बेरोजगार झाला आणि बांधकाम विश्वाकडे वळला आहे .या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भविष्याची काळजी घेतल्याशिवाय आता पूढे जाता येणार नाही यासाठी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजार समिती संचालक संचिन घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेले हे काम फार मोठे आहे.त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.अशा या बांधकाम व्यावसायिक शेतकरी मजूर वर्गाला शासनाने हजारो कोटी खर्च करून त्यांच्या भविष्याची काळजी घेतली आहे.

यावेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले की,सामांन्य माणसाचे समाजात जगताना काय हाल होतात हे आंम्ही नेहमी अनुभवत आलो आहे आणि म्हणूनच संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सदस्यांच्या सहकार्यातून हजारो लोकांना न्याय मिळवुन दिला आहे. यापूढेही हा कार्यक्रम आंम्ही असाच चालवणार आहोत. यावेळी बोलताना भुदरगड तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई म्हणाले की, कामगार संघटनेचे हे काम तालुका स्तरावर करा जे लागेल ते सहकार्य आंम्ही पक्षीय पातळीवर करू.त्यासाठी जे योगदान द्यावे लागते ते योगदान देण्यास आंम्ही कटीबध्द आहोत.

मौनी विद्यापीठाचे संचालक प्राचार्य आर डी बेलेकर म्हणाले की, बांधकाम कामगारांच्या व्यथा लक्षात घेवून मजूरांच्यासाठी कॉंग्रेस पक्षाने केलेले काम खूप मोठे आहे. सचिन घोरपडेंचे हे योगदान विसरता येणारे नाही. याला ताकद देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे कायमचे स्मरण बांधकाम व्यावसासिकांनी ठेवावे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला आपल्या प्रास्तविकात बोलताना खानापूरचे माजी सरपंच भुजंगराव मगदूम म्हणाले की, आतापर्यंत १००० लोकांची नोंदणी पुर्ण झाली आहे.सचिन घोरपडेंनी स्वत:कडचे पैसे घालून या साऱ्या लाभार्थ्यांच्या नोंदणी मोफत केल्या आहेत.अजूनही लाभ घ्या असे आव्हाहन त्यांनी यावेळी केले. आलेल्या हजारो लाभार्थ्यांना आज नोंदनीपत्रही देण्यात आले तसेच पेटी वाटपसठीचे रजिस्ट्रेशनही पुर्ण करण्यात आले.आलेल्या सर्व महिला पुरूषांनी सुचनांचे पालन करत शिस्तीने कांम पुर्ण केले.
कार्यक्रमात राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या नुतन सदस्यांचा सत्कार प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुणे व मामन्यवरांचाही सत्कार संपन्न झाला.

यावेळी जिल्हा युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष संजयसिंह सरदेसाई, एस एम पाटील, बाबासाहेब देसाई उदय पाटील ( गंगापूर ), सुशांत माळवी, तेज कामगार संघटनेचे अध्यक्ष धनाजी कुरळे,सेवा फाउंडेशनचे अमोल पाटील, तानाजी दाभोळे धोंडीराम गुरव तानाजीराव कुरडे,गौरव राजगिरे, वैभव तहसिलदार, ऋषिकेश पाटील धनंजय पाटील प्रदीप पाटील, बाळू गुरव, बाळासो शिंदे, वाघापूरचे सरपंच दिलिप कुरडे, माजी सभापती बापूसो आरडे, युवक काँग्रेसचे अजित परीट राष्ट्रीय युवक सेवा फाऊंडेशन चे पदाधिकारी बबन कांबळे, प्रतिक पाटील कृष्णात कल्याणकर,विविध गावातून आलेल्या महिला, पुरूष मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते. सुत्रसंचालन पत्रकार धनाजी आरडे यांनी केले तर आभार अमर बरकाळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *