मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल श्री .जैन श्वेतांबर मंदीर येथे “पर्युषण पर्व ” सोहळा मोठया उत्साहाच्या वातावरणात पार पडला. श्री. वासुपूज्य भगवान मुळनायक मंदीराचा नुकताच जिर्णोद्धार पूर्ण झाला असून हे मंदीर मुरगूड व परिसरातील एक सुंदर, कलात्मक, नाविन्यपूर्ण काच मंदीर असे संबोधले जाते. हे मंदीर भाविकानी पहातानां नक्कीच डोळ्याचे पारणे फिटेल यात शंका नाही.
”पर्युषण पर्व ” उत्सवानिमित्य गेल्या आठ दिवसापासून मंदीरामध्ये दररोज विविध पूजा , स्नान पूजा , वाचन , विविध नयनरम्य आंगी याबरोबरच सायंकाळी आरती , भावना ( भक्ती गीते ), दांडीया रास , गर्भनृत्ये असे विविध कार्यक्रम पार पडले. या पर्व निमित्ताने जैन भाविकांच्या विविध आलम , अप्ठई, समोसरण तप,नवकार-महामंत्र तप अशा विविध तपश्चर्या झालया.
“पर्यूषण पर्व ” मधील बुधवारी ” संवत्सरी ” दिवशी जीव- प्राण्यांची क्षमा याचनां-मागून पर्व संपन्न झाले .
या पर्व निमित्ताने मंदीराला आकर्षक व सुंदर अशी विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. शनिवारी रथ-बणी , बँड वाद्य, तपस्वी यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली . या शोभायात्रेमध्ये मुरगूड परिसराबरोबरच बानगे , सोनगे , बिद्री ,राशिवडेसह अनेक गावामधून जैन बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
या पर्युषण पर्वाच्या निमित्ताने शोभायात्रेदरम्यान संपूर्ण मुरगूड शहरामध्ये बुंदी लाडू प्रसाद पाकिटांचे वाटप करत ही शोभायात्रा श्री .जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदीर येथे आणण्यात आली.