बातमी

बळीराम रेपे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : राधानगरी तालूक्यातील विद्यामंदिर अवचितवाडी येथे श्री . बळीराम रेपे यांचा सेवानिवृत्ती निमित भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या भावपूर्ण सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपती नाना सावर्डेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित संभाजी पाटील होते.

सुरूवातीला श्री बळीराम रेपे यांचा सेवानिवृत्ती बद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत अवचितवाडी, पालक, तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने शाल, श्रीफळ, मानाचा कोल्हापूरी फेटा बांधून नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी भीमराव रेपे यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगताचे वेळी ते खूपच भाऊक झाले. भरल्या अतःकरणाने बोलताना ते म्हणाले , बापू हे आमच्या घरातील आधारस्तंभ आहेत. आमच्या घराण्यातील साऱ्यांची जडण घडण बापूंच्या मार्गदर्शनाखाली झाली. आपली अर्जित रजा शिल्लक असताना सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे पवित्र योगदान बळीराम रेपे सरानी दिले, हे आत्मीक समाधान कोणत्याही मोजपट्टीने मापता येण्यासारखे नाही, असे संभाजी पाटील म्हणाले तसेच भविष्यात जिं.प. शाळा टिकवणे हे पालकांच्या हातात आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामस्थ, पालक यांनी बळीराम रेपे यांनी मुलांना शाळेत चांगले शिक्षण दिले असल्याचे मनोगतातून सांगितले . शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन गणपती नाना सावर्डेकर यांनी बळीराम रेपे यांनी सेवा काळात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा इत्यंभूत आढावा अध्यक्षिय भाषणातून घेतला आणि श्री.रेपे यांना निरोगी आणि उत्तमोतम दीर्घायुरारोग्य चिंतले.

सत्काराला उत्तर देताना बळीराम रेपे म्हणाले, आजपावेतो ३४ वर्षे सेवा झाली. या कालावधीत स्कॉलरशीप, सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय या शैक्षणिक संकूलात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्याकडून भरीव स्वरूपाची तयारी करून घेतल्यामुळे मोठ्या संखेने विद्यार्थ्याना प्रवेश मिळाला. तद्वत शासनाच्या विविध विभागामध्ये कांही विद्यार्थी त्यांच्या कार्याची मोहर उठवून शाळेच्या आणि परिणामी गावच्या नावलौकीकात मोलाची भर घालत आहेत.

ते म्हणाले आजोबा भीमराव बाबाजी रेपे हे सरवडे गावचे पहिले सरपंच. तर वडील एक करारी तालुकामास्तर त्यांची परंपरा आणि वारसा आम्ही अखंडितपणे चालवत आहोत. सत्कार समारंभा नंतर श्री बळीराम रेपे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व शालोपयोगी साहित्य आणि विद्यार्थ्यांना मान्यवरान्च्या हस्ते खाऊ वाटप केले.

समारंभाला शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मारुती दत्तू पाटील, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राधानगरी तालुका अध्यक्ष मा .श्री . भीमराव रेपे, ग्रामपंचायत सदस्या सौ. साक्षी बाबुराव पाटील,सरवडे मा. ग्रामपंचायत सदस्य श्री. रंगराव रेपे, सुरेश दिनकर पाटील,सागर तेली, तानाजी रानमाळे, तोरसे आण्णा, रवि बाऊसकर, आदी उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *