बाचणी – जयभारत कला क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष पदी भरत प्रकाश चौगले तर उपाध्यक्षपदी सतीश रंगराव चौगले असून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपणारे हे मंडळ असून यावर्षी गणेशउत्सवमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार केला जाईल.
तसेच विधवा महिलांचे हस्ते दहावी व बारावी उत्तीर्ण विध्यार्थी चे सत्कार तसेच कोरोना काळा मध्ये चांगले कार्य करणारे डॉक्टर, सेविका, याचं सत्कार व गावामध्ये वृक्षारोपण व मंदिर परिसरमध्ये सफाई केली जाईल व सामाजिक प्रबोधन होइल अशी भव्य मिरवणूक काढली जाईल असे मंडळाचे अध्यक्ष भरत चौगुले यांनीव्यक्त मनोगत केले.