मुरगूड ( शशी दरेकर ) : भारतीय जनता पार्टीच्या सर्व योजना कोणत्याही प्रकारचे कमिशन न घेता थेट सर्वसामान्य जनतेच्या हातात पोचवायचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी केले.
ते मुरगुड येथील दत्ता देशमुख हाॅल येथे झालेल्या बांधकाम कामगार कल्याण शिष्यवृत्ती वाटप व महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर मागासवर्गीय साठी राखीव 20 टक्के योजनेतून सायकल वाटप कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील होते
स्वागत दगडू शेणवी तर प्रास्ताविक प्रतापसिंह पाटील यांनी केले. यावेळी गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील म्हणाले नऊ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवले .परंतु विरोधकांनी त्यांची टिंगल करण्यात सुरुवात केली.आज जगामध्ये भारत देश हा पाचव्या क्रमांकाच्या प्रगती पथावर आहे.पुढच्या दहा वर्षात भारत देश हा पहिल्या तीन क्रमांकामध्ये घेऊन जातील असा विश्वास आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी चे हात बळकट करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा खासदार व तालुक्याचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचाच झाला पाहिजे असे मत रणजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास बिद्रीचे माजी उपाध्यक्ष सुनिलराज सूर्यवंशी, अनंत फर्नांडिस, वसंतराव पाटील, बजरंग सोनुले ,दत्तामामा खराडे, संजय चौगुले, प्रविण चौगुले ,सात्तापा खंडागळे, अमर (छोटू)चौगले ,विजय राजीगरे, विलास गुरव ,सदाशिव गोधडे ,राहुल खराडे ,सुरज एकल ,नाना डवरी , उत्तम पाटील,दिंगबर अस्वले ,सागर मोहिते, आदी उपस्थित होते सूत्रसंचालन संग्राम साळुंखे यांनी तर आभार सुशांत मांगोरे यांनी मानले.