मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड व मुरगूड परिसरातील अग्रगण्य आणि विश्वसनीय पतसंस्था म्हणून नावारूपास आलेली श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन२०२३ते २०२८या कालावधीसाठी विनविरोध करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री .एस.एस. पाटील यानीं याबाबतचे पत्र पाठवून संस्थेला तसे कळविले आहे. श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे – संचालक सर्वश्री. किशोर विष्णूपंत पोतदार (मुरगूड), साताप्पा बापूसो पाटील (यमगे), प्रशांत जवाहर शहा (मुरगूड), नामदेव कृष्णाजी पाटील (मुरगूड), शशिकांत गुंडा दरेकर (मुरगूड), प्रदिप दत्तात्रय वेसणेकर (मुरगूड), निवास पांडूरंग कदम (मुरगूड), धोंडीबा बाबालाल मकानदार (मुरगूड), संदीप दत्तात्रय कांबळे (मुरगूड), किरण विठ्ठल गवाणकर (मुरगूड), प्रकाश धोंडीराम सणगर (मुरगूड), सौ. रोहिणी शिवाजी तांबट (मुरगूड), सौ. सुनंदा सुरेश जाधव (मुरगूड), श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झालेबद्द्ल सभासद वर्गातून समाधान व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.