
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेस सातेरी अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी गोवा या शाखेचे एम. डी. श्री. गावस साहेब व त्यांच्या शाखेचे शाखाधिकारी यांनी नुकतीच पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली.
यावेळी संस्थेचे चेअरमन मा. श्री. किशोर पोतदार यानीं संस्थेच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. सर्व कामकाजाची पध्दत पाहून गावस साहेब आणि शाखा पदाधिकाऱ्यानीं समाधान व्यक्त करून संस्थेचे कौतूक केले.

या सदिच्छा भेटीवेळी संस्थेचे चेअरमन श्री . किशोर पोतदार , जेष्ठ संचालक अनंत फर्नाडिस , कार्य लक्षी संचालक नवनाथ डवरी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी , कर्मचारी वर्ग उपस्थित होता. शेवटी सदिच्छा भेटीनिमित्य आलेल्या मान्यवर पदाधिकाऱ्यानां पुष्पगुच्छ , शिल्ड व अहवाल देऊन सर्वांचे आभार मानले.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!