मडिलगे( जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे समस्त धनगर बांधव यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर दत्तात्रय वाघमोडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धनगर समाजाप्रती दिलेले योगदान तसेच त्यांच्या धगधगत्या संघर्षाची यशोगाथा वाघमोडे यांनी मांडली.
यावेळी जोतीराम डोणे, बिरू डोणे, अभिजीत डोणे, गणेश पडवळे, रामचंद्र डोणे, जोतीराम डोणे, शिवाजी डोणे, रावसाहेब डोणे, बिरदेव पडवळे यांच्यासह धनगर समाज तसेच पुजारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता