कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) च्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक (२०२६- २०३१) घेण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या दुग्धव्यवसाय विकास विभागाने या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कालमबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे.
Advertisements
विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), पुणे विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार, या निवडणुकीसाठी ०४.०५.२०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे.
Advertisements


याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित अधिकारी किंवा जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, कोल्हापूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.