प्रवाशांच्या जीविताला धोका; एस.टी. महामंडळाने तातडीने लक्ष देण्याची गरज
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड निपाणी मार्गावरील सुरुपली (ता. कागल) येथील एस.टी प्रवासांच्यासाठी असलेले बस स्थानकाची दुरावस्था झाली असून त्यांच्या भिंतीना इजा पोहचल्याने ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे एस.टी बस च्या प्रतिक्षेत थांबनाऱ्या प्रवाशासाठी हे धोकदायक आहे त्यामुळे येथे नवीन बस स्थानक तातडीने बांधावे अशी मागणी माजी सरपंच वाय.एस.पाटील यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
निपाणी राधनगरी मार्गावरील सुरुपली येथील एस.टी. बसस्थानकामध्ये सुरुपलीसह मळगे खुर्द ,मळगे बुद्रुक येथील प्रवाशी तसेच शालेय विद्यार्थी,वृद्ध मोठ्या प्रमाणात एस.टी बसच्या प्रतीक्षेसाठी आसरा घेतात सध्याचे हे निवारा शेड फारच जुने झाले तरी मजबूत बांधकामाचे आहे पण या शेडच्या भिंतीना इजा पोहचवल्याने ते धोकादायक झाले आहे त्यामुळे हे शेड कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशावेळी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी ते तातडीने दुरुस्त करावे नाहीतर नव्याने बांधावे अशी मागणी सुरुपलीचे माजी सरपंच वाय.एस.पाटील यांनी प्रशासनाकडे व प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनातून केली आहे .