बातमी

डॉ. बाबासाहेबांच्या विचारामध्ये मानव कल्याणाची ताकद आहे या विचारावर चालण्याचा पुनर्निर्धार करुया- मुख्याध्यापक व्ही. जी. पोवार

पिंपळगाव खुर्द (आण्णाप्पा मगदूम): श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय, व्हन्नूर ता.कागल येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. ते पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला, समाजाला पुढे घेऊन जाणारा आहे.

यावेळी संभाजीराव पाटील,भाऊसो खाडे,जितेंद्र सावंत,भाऊसो बोराटे, शिवाजी तिकोडे,शानाजी माने,मनिषा खोत, राजश्री इंगवले, निर्मला यादव, अश्विनी पोवार, जयश्री वैराट व जगन्नाथ करपे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *