बातमी

आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील हसू हे स्वर्गातील सोनं – वसंत हंकारे

मडिलगे (जोतीराम पोवार) : ज्या आई-वडिलांनी तुमचं आयुष्य सुखकर होण्यासाठी संघर्ष पाहिला त्या आई-वडिलांना समाजात वावरताना शरमेन मान खाली जाणार नाही असे कोणतेही कृत्य करू नका कारण आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील दिसणारा आनंद हा स्वर्गातील सोनं असतं असे प्रतिपादन व्याख्याते वसंत हंकारे यांनी वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या आई बाप समजावून घेताना या विषयावरील व्याख्यानात बोलताना व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे म्हणून भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना हंकारे म्हणाले सोशल मीडियाच्या माध्यमातून आजची तरुणाई आई-वडिलांचे संस्कार पायदळी तुडवत आहेत आईच्या वेदनेच आणि बापाच्या मोलाच्या संघर्षाचे गणित कधीच समजणार नाही जोपर्यंत घरातील आईबाप समजत नाही तोपर्यंत तुम्हाला देवही करणार नाही आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा समजा भविष्यात तुम्ही कितीही मोठे व्हा मात्र तुम्हाला मोठं करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आई-वडिलांना कदापिही विसरू नका असे हंकारे यांनी सांगितले.

प्रारंभी वसंत हंकारे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सरपंच बापूसो आरडे, उपसरपंच सागर कांबळे, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, व ग्रामस्थांच्या वतीने दीप प्रज्वलन व शिवप्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती तसेच हंकारे यांनी आई बाप आपल्यातून निघून गेल्यानंतर कळणारी किंमत हे समजावून घेताना उपस्थित महिला भावुक झाल्या.

कार्यक्रमास आनंदा घोरपडे, संदीप कोळी, दत्तात्रय पाटील, बाबासाहेब जठार, उदय दाभोळे, जोतीराम आंबी, अभिजीत पाटील, शिवप्रसाद गुरव, अभिजीत कुंभार, प्रवीण आरडे, संदीप कांबळे,यांच्यासह वाघापूर हायस्कूलचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, विद्या मंदिर वाघापूर चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक अर्जुन दाभोळे यांनी तर आभार राजेंद्र एकल यांनी मांनले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *