बातमी

विविधरंगी कोल्हापूर खुली छायाचित्र स्पर्धेसाठी 13 मार्चपर्यंत छायाचित्रे पाठवावीत

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारांना अनुक्रमे 51, 35, 21 हजार रुपयांचे पारितोषिक

कोल्हापूर दि. 1 : पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याची जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे व पर्यटन विषयक बाबींवर आधारित ‘विविधरंगी कोल्हापूर..!’ खुली छायाचित्र स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निवड होणाऱ्या छायाचित्रांचा समावेश जिल्ह्याच्या कॉफी टेबल बुक (छायाचित्र पुस्तिका) मध्ये छायाचित्रकारांच्या नावासह करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी छायाचित्र पाठविण्याची अंतिम मुदत 13 मार्च 2023 रोजी रात्री 12.00 पर्यंत राहिल. स्पर्धेची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या www.kolhapur.gov.in या संकेतस्थळावर https://kolhapur.gov.in/en/notice/vividharangi-kolhapur-photography-competition-2023/ येथे उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्याची पर्यटनविषयक आकर्षक छायाचित्रे जगासमोर यावीत व जगभरातील पर्यटकांनी कोल्हापूरला भेट द्यावी, यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

अंतिम निवड करण्यात आलेल्या प्रत्येक छायाचित्रासाठी 3 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारांना प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये, व्दितीय पारितोषिक 35 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 21 हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी 15 हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे, असेही श्री. रेखावार यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *