बातमी

शिंदेवाडीत उद्या रविवारी भव्य मॅरेथॉन स्पर्धा

मुरगुड ( शशी दरेकर ) : यंदाच्या नवरात्रोत्सवात शिंदेवाडी ता.कागल येथील युवा स्पोर्ट्स यांच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी दि २२ रोजी आयोजन करण्यात आले आहे .त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

त्यामध्ये १६०० मीटर धावणे मुलांसाठी
प्रथम क्रमांक ३००१ रुपये व चषक गणेश तोडकर (युवा नेते ) यांचेकडून, द्वितीय क्रमांक २००१ रुपये व चषक राहुल खराडे (डे. सरपंच) यांचेकडून व तृतीय क्रमांक १००१ रुपये व चषक किशोर शिंदे (मेजर) यांचेकडून बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.तर मुली (१६०० मीटर) धावणे प्रथम क्रमांक ३००१ रुपये व चषक इंजिनिअर मयुर आंगज व विनायक खराडे (युवा नेते ) यांचेकडून,द्वितीय क्रमांक २००१ रुपये व चषक रणजित कदम(डिसलरी मॅनेजर हलसिध्दनाथ शुगर) यांचेकडून तर तृतीय क्रमांक १००१ रुपये व चषक अजित मोरबाळे (डे. सरपंच) यांचेकडून बक्षिसे ठेवण्यात आली आहेत तसेच स्पर्धेसाठी सर्व चषक विनायक.वि वदुरे (युवा उद्योजक) पॉवर हाऊस प्रोटीन शॉप मुरगूड यांच्या मार्फत दिली आहेत.सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून

स्पर्धा रविवारी सकाळी ठिक ८ वाजता शिंदेवाडी ता. कागल जि. कोल्हापूर येथे ठेवण्यात आली आहे.स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी खालील नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे- ओंकार शिंदे – ९७६५१६९०६१ / ओंकार खराडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *