बातमी

संजय चितारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

कागल : कागल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संजय चितारी यांच्या वाढदिवसानिमित्त 120 बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच व स्मार्ट कार्ड वाटप, विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती धनादेशचे वाटप, मोफत कोव्हीडचा दुसरा डोस, साठ वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस, रुग्णांना फळे वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.

 यावेळी केडीसीसी बँक संचालक भैय्या माने, गोकुळ संचालक युवराज पाटील, प्रकाशराव गाडेकर, रमेश माळी, सुनील माने यांनी चितारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नितीन दिंडे, नवल बोते, शशिकांत नाईक, पंकज खलिफ, अमित पिष्टे, चितारी कुटुंबीय यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *