कागल(विक्रांत कोरे): कागल बसस्थानक परिसरात टिंगल टवाळी करीत फिरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना कागल पोलीस ठाण्याच्या महिला सिंघमने दाखविला कायद्याचा धाक. त्यामुळे तरुणांच्या मध्ये चांगलीच धडकी बसली आहे. त्याचबरोबर विद्यालयीन तरुणीनाही कायद्याचे प्रबोधन केले.
सकाळचे अकरा वाजून गेले होते. महाविद्यालयाची सुट्टी झाली होती. बस स्थानक परिसर विद्यार्थ्यांनी गजबळून गेला होता. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुमार जाधव यांना निनावी फोन आला. साहेब बस स्टैंड वर तरुण मुले टिंगल टवाळी करीत फिरत आहेत. जाधव साहेबांनी तात्काळ बस स्थानक परिसरात असलेल्या महिला कॉन्स्टेबल स्वाती थोरात यांना कॉल केला व माहिती दिली. कॉन्स्टेबल थोरात यांनी तात्काळ बस स्थानक गाठले. कायद्याचा धाक दाखवत तरुणांना शाब्दिक प्रसाद दिला तर काही तरुणांनी तेथून गपचूप पळ काढला.

तसेच बसस्थानकात बसलेल्या तरुणींना व महिलांना एकत्र करून, बसमध्ये चढताना अगर बस मध्ये चढल्यानंतर पर्स व बॅगेतून कशा प्रकारे चोरटे हात मारतात याचे प्रबोधन केले व महिलांनी सुरक्षित प्रवास कसा करावा याबाबत महिला कॉन्स्टेबल स्वाती थोरात यांनी प्रबोधन केले. महिलांना विद्यार्थिनींना काही अडचण असल्यास कागल पोलिसांनी संपर्क साधावा असे आवाहनही थोरात त्यांनी केले.
महिला सिंघम थोरात यांनी बस स्थानक परिसरात विना लायसन वाहन चालवणे पाच जणांवर दोन हजार पाचशे रुपये, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे दोघांकडून रुपये दोन हजार, तिब्बल सिट बसणाऱ्या आठ जणांकडून रुपये 4000, वसूल करून दंडात्मक कारवाई केली .सदरच्या कारवाईमुळे महिला सिंघम स्वाती थोरात यांचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी अभिनंदन केले.