बातमी

कागलमध्ये राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते दिमाखात उदघाटन, राज्यातील निमंत्रित १४ संघ सहभागी

उद्या रविवारी बक्षिस वितरण

कागल(प्रतिनिधी) – शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राजे विक्रमसिंह घाटगे निमंत्रितांच्या राज्यस्तरीय हॉलीबॉल चषक स्पर्धेत १४ संघ सहभागी झाले आहेत. राजे समरजितसिंह घाटगे व युवराज आर्यवीरराजे घाटगे यांच्या हस्ते कबुतर सोडून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी वसंत पाटील होते.

आज पहिल्या दिवशी झालेल्या लढतीत पुणे, इस्लामपूर, कुरुंदवाड, निपाणी, निगवे या संघाने पहिल्या फेरीत विजय मिळवीत पुढील फेरीत प्रवेश केला. आज स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १८ साखळी सामने झाले. कोल्हापूर जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा होत आहेत. सांगली, सातारा, इस्लामपूर, पुणे, कुरुंदवाड,निपाणी, उंब्रज, कागल,निगवे, इंगळी, मुरगुड, लिंगनूर, जयसिंगपूर येथील संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेच्या धर्तीवर या स्पर्धेचे संयोजन केले आहे. दोन कोर्टवर दिवस-रात्र प्रकाशझोतात या स्पर्धा होत आहेत. प्रेक्षकांसाठी स्क्रीनसह सुसज्ज प्रेक्षक गॅलरी उभारली आहे .तसेच या स्पर्धेचे युट्युब चॅनेलवर थेट प्रक्षेपणही करण्यात येत आहे. भारतीय हॉलीबॉल महासंघाचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी व जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे सचिव सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहेत.

पंच म्हणून महेश शेडबाळे, शहनवाज मोमिन, विनोद रणवरे, योगेश वराळे, कपिल खोत, अनिल देवडकर, दीपक चव्हाण, मारुती काशिद, संजय पाटील, प्रवीण मोरबाळे आदी काम पाहत आहेत.

सुनील गायकवाड यांनी सामन्यांचे बहारदार समालोचन केले. अश्विनकुमार नाईक, के.बी.चौगुले,बाळासो जाधव, संजय हजारे ,शिवानंद चौगुले यांच्यासह हॉलीबॉल खेळाडू संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

यावेळी शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी, खेळाडूसह हॉलीबॉलप्रेमी शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविवारी अंतिम सामने स्पर्धेचा समारोप उद्या रविवारी ता 9 रोजी साखळी,उपांत्य व अंतिम सामन्यानंतर होईल.या सामन्यांना सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल.तर सायंकाळी बक्षीस वितरण राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते व राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *