बातमी

कु. यशश्रीचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

कागल (विक्रांत कोरे) : एकोंडी (ता.कागल) येथील कु. यशश्री गणपती धनगर (पुजारी) हिचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी कुमार व कन्या विद्यामंदिर, सिद्धनेर्ली येथील शाळेतील २०० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनीना शैक्षणिक साहित्य, केळी, दुपारच्या जेवणात शिरा तसेच अंगणवाडीतील १५० मुलांना जेवणाचे प्लेटा तसेच केळी व पेन्सिल वाटप करून साजरा करण्यात आला.

यावेळी कुमार व कन्या विद्यामंदिरचे प्र. मुख्याध्यापक व यशश्रीचे वडील गणपती धनगर (पुजारी) म्हणाले, यशश्री ही नावाप्रमाणेच सदैव यशस्वी होणार. तिने मनाशी एक ध्येय बाळगले आहे, आयएएस होण्याचे. त्यापमाणे तिची पुढील वाटचाल सुरु आहे. मी सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. मला सामाजिक कामांची आवड आहे. त्यामुळे मी यशश्रीचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनीच करण्याचा ठरवला, असे ते म्हणाले.

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम पाटील, सदस्य विलास पोवार, संतोष पाटील, नंदकुमार निकम, सागर गवळी, वनिता घराळ, अक्षता पोतदार, प्रियांका पाटील, नंदिनी कांबळे, अश्विनी गोनुगडे, विद्या भोसले तसेच कुमार व कन्या विद्यामंदिर, सिद्धनेर्लीचे सर्व शिक्षक, अंगणवाडी शिक्षिका, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *