बातमी लेख

पक्षाचा नव्हे मतदारांचा जाहिरनामा आवश्यक

ब्रिटीशांच्या विरोधामध्ये 100 वर्षे लढा भारतीयांनी केला. अनेक मार्गांनी तो चालला. आपल्या देशातील सर्वसामान्य माणसांनी त्यामध्ये भाग घेतला. अनेक राजकीय पक्षांनी या लढ्यामध्ये भाग घेतला. अनेक क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने सत्तेवर आलेल्या पक्षांनी प्रयत्न केला. स्वातंत्र्याची लढाई करताना देशातील पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियासुद्धा आघाडीवर होत्या. […]

लेख संपादकीय

कॉ. पानसरे नी प्रतिगाम्यांशी टोकाचा संघर्ष केला

20 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्रातील थोर विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांचा मृत्यू झाला. कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नीवर सकाळी फिरावयास गेल्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी खुनी हल्ला झाला. चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. सारे कोल्हापूर शहर आणि महाराष्ट्र हादरला. त्यांच्या स्मारकाचे नुकतेच कोल्हापुरात उद्घाटन झाले. ज्या दिवशी कॉम्रेड पानसरे यांच्यावर […]

लेख

मराठा आरक्षण; ओबीसींचे संरक्षण – ओबीसीचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला असुन, मराठा तथा ओबीसी दोन्ही समाज घटकांकडुन मोठ-मोठे मेळावे आंदोलने होत आहे. एकमेकांवर वार पलटवार होऊन सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचा अनेक ठिकाणी गंभीर प्रकार घडत असुन, समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. शेकडो वर्षे गाव गाडयामध्ये एकोपाने तसेच बंधुभाव आणि प्रेमाने वागणारे मराठा आणि ओबीसी बांधवामध्ये कटुता निर्माण करण्याचे काम राजकारणी […]

लेख

स्वातंत्र्य सेनानी कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे : निष्ठा, त्याग आणि दूरदृष्टीचा महामेरू – डॉ. अशोक ढवळे

१ ऑक्टोबर २०२३ रोजी, मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षी आणि स्वातंत्र्यसेनानी व माजी खासदार कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या १५व्या स्मृतिदिनी बीड जिल्ह्यात मोहा या त्यांच्या गावी त्यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी खासदार सीताराम येचुरी यांच्या हस्ते संपन्न झाला. कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे हे मराठवाड्याच्या डाव्या चळवळीतील एक उत्तुंग […]

लेख

  जागतिक अल्झायमर दिन (World Alzheimer’s Day)

            जागतिक अल्झायमर दिन (World Alzheimer’s Day) हा दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. अल्झायमर हा एक मेंदूचा विकार आहे ज्यामुळे स्मृतीभ्रंश होतो. सोप्या शब्दात सांगायच तर विसरभोळेपणा जो कालांतराने वाढत जातो. यंदाची थीम “Never too early never to late” म्हणजे जोखीम घटक ओळखणे आणि जोखीम कमी करण्याचा सक्रिय उपायांचा अवलंब करणे […]

लेख

स्त्रिया आणि अस्पृश्यांना शिक्षणाची संधी देणारा महात्मा

अस्पृश्यांसाठी महात्मा जोतिबा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली. या घटनेला 172 वर्षे झाली. अस्पृश्यता हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे. या समाजाचा उद्धार करावयाचा असेल तर त्यांना शिक्षण दिले पाहिजे अशी जोतिरावांची धारणा होती. शिक्षणामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल, त्यांना मनुष्यत्व प्राप्त होईल. स्त्रिया आणि शूद्र यांच्या तत्कालीन स्थितीला शिक्षण हेच कारणीभूत आहे. त्यामुळे स्त्रियांची […]

लेख

देवशयनी आषाढी एकादशी महात्म्य

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी आषाढी एकादशी’ म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. गुरुवार २९ जून रोजी […]

लेख

दूरदृष्टीचा प्रजावत्सल राजा – राजर्षी छत्रपती शाहू महाराज

26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास केला. राज्य व देशाला समतेचा संदेश दिला. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या लौकिकास शाहू महाराजांचे कार्य दिपस्तंभासारखे असून त्यांनी त्याकाळी घेतलेले निर्णय आजही त्यांच्या दूरदृष्टीपणाची साक्ष देतात. राजर्षी शाहू महाराजांनी शंभर […]

लेख

लिव्ह इन वाल्या धाडसी मुलींनो टॉक्सिक नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं

मागच्या सहा महिन्यात लिव्ह-इन पार्टनरची हत्या झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. आजकाल मुली आपल्या पसंतीचा जोडीदार निवडतात. पण आता प्रेमाच्या आणाभाका घेऊन त्यांची आयुष्यभरासाठी सोबत करतो म्हणणारे जोडीदारसुद्धा त्यांची हत्या करू लागलेत. समोर येणारी प्रत्येक घटना पहिल्या घटनेपेक्षा अधिक भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. आधी मुलीची हत्या केली जाते. नंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न केला जातो. […]

लेख

राजर्षींच्या नगरीत गुंडगिरीला थारा नको

गुन्हेगारी का वाढते आणि गुन्हेगारांना समाजात का प्रतिष्ठा मिळते याचा विचार करण्याची सध्या वेळ आली आहे. गुन्हेगारांना राजकीय पक्षात प्रतिष्ठेचे स्थान मिळताना दिसते. सध्याच्या काळात राजकारणात, धर्मकारणात गुन्हेगार सर्वत्र दिसतात. या गुन्हेगारांना प्रचंड पैसा पुरवला जातो. त्यामुळे राज्य कायद्याचे आणि न्यायाचे हवे असे वाटत असताना कायदा पाळणाऱ्यापेक्षा कायदा मोडणाऱ्या प्रवृत्ती जास्त दिसतात. देशात काही पक्षांनी […]