बातमी

मानसिक आरोग्यासाठी टेलिमानस हेल्पलाईनवर कॉल करण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 14 : केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग ॲक्रॉस स्टेटस’ (टेली-मानस) उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. घरबसल्या या सेवेचा उपयोग घ्यावयाचा असल्यास टेलिमानस हेल्पलाईन 14416 वर कॉल करण्याचे आवाहन सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी केले आहे.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम हा कक्ष सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे कार्यरत आहे. या कार्यक्रमांतर्गत मानसिक आजार असलेल्या रुग्णांवर उपचार, समुपदेशन व मोफत औषधोपचार करण्यात येतात. टेली मानस हा या कार्यक्रमाचा एक भाग आहे.

घरबसल्या या सेवेचा उपयोग करुन घेण्यासाठी हेल्पलाइन नंबर 14416 वर कॉल करुन मानसिक आजारांविषयी (उदा. उदासिनता, काळजी, स्किझोफेनिया, मुड डिसऑर्डर, आत्महत्या, व्यसन, मत्सर, स्ट्रेस, नैराश्य, न्युनगंड, वैफल्य तसेच भीती, हिंसा, ताण, चिंता, अस्थिरता आणि असुरक्षितता इ.) सविस्तर माहिती मिळवू शकता, अशी माहिती सेवा रुग्णालय कसबा बावडा, कोल्हापूर येथे मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत मानसोपचार विभागात देण्यात येते.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम – सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर ओपीडी सोमवार, बुधवार व शनिवार तर बाह्यओपीडी / क्षेत्रभेटीचे दिवस मंगळवार, गुरुवार व शुक्रवार याप्रमाणे आहेत.

29 Replies to “मानसिक आरोग्यासाठी टेलिमानस हेल्पलाईनवर कॉल करण्याचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *