कागल (विक्रांत कोरे) : दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचे कागल मध्ये अपहरण झाल्याची घटना घडली आहे .ते दोघेजण क्लासला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. तारीख 24 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली आहे .या घटनेने कागलसह कोल्हापूर जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे .या घटनेची कागल पोलिसात तक्रार नोंदविण्यात आलेली आहे.
वेदांत संतोष सोनार वय वर्षे 15, राहणार -बेघर वसाहत, कागल. शिवांश औनीश सिंग वय वर्षे 15 राहणार- ओमकार कॉम्प्लेक्स ,जयसिंगराव पार्क, कागल. अशी अपहरण झालेल्या मुलांची नावे आहेत.
कागल पोलीसातून मिळालेल्या माहितीनुसार, शिवांश सिंग हा आपल्या सायकलवरून डी आर माने कॉलेज जवळ असलेल्या क्लासला गेला होता. तो सायकल सह गायब आहे. तर वेदांत सोनार हा सुद्धा डी आर माने महाविद्यालया जवळच्या क्लासला जात होता वेदांची आई सुनीता सोनार हिने आपल्या दुचाकीवरून वेदांतला क्लास जवळ सोडले होते या दोघांनाही कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळून नेऊन अपहरण केल्याची घटना घडली आहे.
वेदांत सोनार याच्या अंगात हिरव्या रंगाचा टोपी असलेला जर्किन आहे. फिकट पांढऱ्या रंगाची फुल पॅन्ट ,अंगाने मध्यम, रंगाने सावळा ,केस लहान चेहरा उभट कान, बारीक डोळे लहान काळे ,पायात काळया रंगाची चप्पल ,क्लासची काळया रंगाची बॅग .असे त्याचे वर्णन असून तो मराठी हिंदी भाषा बोलतो. त्याचप्रमाणे शिवांश सिंग यांच्या अंगात लाल रंगाचा टी-शर्ट, निळा रंगाची फुल पॅन्ट, अंगाने सडपातळ, रंगाने गोरा, केस लहान ,चेहरा उभट ,कान मोठे ,डोळे लहान काळे ,पायात सॅंडल ,सोबत स्कूल बॅग व सायकल असे त्याचे वर्णन असून तो मराठी व हिंदी बोलतो. अशा वजनाची मुले आढळून आल्यास तात्काळ कागल पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी केले आहे.
हा प्रकार अपहरणाचा आहे की अन्य कोणता प्रकार असावा ,याबाबत पोलीस तपास करीत आहेत. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे हे पुढील तपास करीत आहेत.