बातमी

पूरसदृश्य स्थितीमुळे मुरगूडच्या आठवडी बाजारावर परिणाम !

मुरगूड ( शशी दरेकर ) : पावसाचा जोर वाढल्याने व सर्वत्र पूरसदृश्य स्थिती व कांही मार्गावरीलं वाहतूक बंद अशा अवस्थेत मंगळवारचा मुरगूड आठवडी बाजार अंत्यत तुरळक प्रमाणात भरला होता. बाजाराला विस्कळीत स्वरूप आले होते. तुरळक बाजामुळे भाजीपाला व इतर विक्रीवर त्याचा परिणाम आला.

दर मंगळवारी भरणारा आठवडी बाजाराला आज विस्कळीत स्वरुप आले होते . मुरगूड ते निपाणी मार्गावर शिंदेवाडीजवळ व मुरगूड ते मुदाळ तिट्टा मार्गावर निढोरी जवळ वेदगंगा नदीला आलेल्या महापूराचे पाणी आल्याने वाहतूक बंद होती. त्यामूळे बाजारासाठी नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती.

जोराचा पाऊस पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पहायला मिळत आहे . त्यामूळे येथील आठवडी बाजारावरही त्याचा विपरीत परिणाम जाणवला .बाजारात व्यापाऱ्याबरोबरच ग्राहकांची संख्याही रोडावली होती. तुरळक स्वरुपात भरलेल्या बाजारात भाज्यांची आवक कमी झाली. कमी आवकमूळे भाज्यांचे व कडधान्यांचे दर कडाडले होते.

महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यात सुप्रसिध्द मानल्या जाणाऱ्या मुरगूडच्या जनावरांच्या आंतरराज्य बाजारावरही अतिवृष्टीचा परिणाम जाणवला जनावरांची आवक घटली होती . त्यामूळे येथील लाखोंची उलाढाल ठप्प झाली होती.

मुरगूडचा तुरळक प्रमाणातील आठवडी बाजार !

बाजारात मासे व खेकडी यांची आवक वाढली होती. मच्छी बाजाराला मात्र तेजीचे स्वरुप आले होते. बाजारात नेहमी खचाखच असणारी गर्दी आज दिसून न येता सर्वत्र सन्नाटा पसरल्याचे चित्र होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *