ताज्या घडामोडी

ही निवडणूक देशाच्या विकासाची……! – हसन मुश्रीफ

महायुतीत एकजूट ठेवा, मान गादीला- मत मोदींना – पालकमंत्री हसन मुश्रीफांचे आवाहन
        

वाकरे येथे करवीर विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा मेळावा

वाकरे, दि. १४: ही निवडणूक देश कुणाच्या हातात द्यायचा यासाठी आहे. निवडणूक लोकसभेसाठीची नाही तर; देशाच्या विकासाची निवडणूक आहे. महायुतीत एकजूट ठेवा. “मान गादीला पण मत मोदींना द्या”, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. वाकरे फाटा ( ता. करवीर ) येथील विठाई – चंद्राई हॉलमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

        यावेळी खासदार धनंजय महाडीक, महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याचे आयोजन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.

               मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज घराण्यानं निवडणूक लढवू नये यासाठी मी प्रयत्न केले. काँग्रेसने त्यांना सन्मानाने राज्यसभेवर घ्यायला पाहिजे होतं. पृथ्वीवरील कोणतीच शक्ती प्रा. मंडलिक यांचा विजय रोखू शकत नाही.

        खासदार धनंजय महाडीक म्हणाले, ही निवडणूक सोपी असली तरी गांभीर्याने उतरावे लागेल. देशातील नागरिकांनी श्री. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे ठरवलय. काँग्रेस ऐनवेळी भावनिक कारण समोर आणील, कारण त्यांचा अजेंडा तयार असतो. काँग्रेसमध्ये भ्रष्टाचाराची मालिका पहिली. परंतु; मोदींच्या काळात नया पैशाचा घोटाळा नाही. राम मंदिर, चांद्रयान २, व्हॅक्सीन, जुन्या मंदिरांचा निर्णोध्दार, विमानतळ, रेल्वे स्टेशन अशी अनेक कामे कोट्यावधी रुपये खर्चून मार्गी लावली. हा पहिला नेता ज्याने विकसित भारताचे स्वप्न पाहिलं.

        माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, २०१४ पासून विकासाचा रथ झपाट्याने चालला. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचलेला आपला देश तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता बनवण्यासाठी मोदींना पंतप्रधान करणे गरजेचे आहे. मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे. कणखर भूमिकेसाठी मोदी पाहिजेत. शेतकरी सन्मान, मोफत रेशन यासह साखर कारखान्यांचा आयकर माफ केला. मुख्यमंत्री सहायता निधी सुरू झाला. ४०० पार करण्यासाठी मी स्वत: उभा आहे, असे समजून मताधिक्य द्या.

        खासदार मंडलिक म्हणाले, वाड्यावर जन्माला आला तरी एकाच मताचा अधिकार आणि झोपडीत जन्माला आला तरी मताचा अधिकार एकच. दहा वर्षात देशाची प्रगती झाली. केंद्रात निवड चुकिची झाली तर त्याला माफी नाही. सुरुवातीच्या काळात शिवसेनेत असूनही निधी मिळाला नाही खासदार फंड आरोग्य विभागासाठी वापरला गेला. शिंदे सरकारच्या काळात कोट्यावधी रुपयांचा निधी या मतदारसंघात खर्च केला. मान गादीला पण मत मोदींना द्या. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची सुरुवात कोल्हापुरातून होत असे. तशीच सुरुवात एकनाथ शिंदे कोल्हापुरातून करत आहेत. अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वाकरे : महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित करवीर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या मेळाव्यात बोलतांना पालकमंत्री हसन मुश्रीफ. उपस्थित खासदार धनंजय महाडीक, खासदार प्रा. संजय मंडलीक, माजी आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके, बाबासाहेब पाटील व मान्यवर.

        राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, केडीसीसी बँकेचे माजी संचालक पी.जी. शिंदे, भाजप करवीर विधानसभा अध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

       यावेळी के. एस. चौगले, एस. आर. पाटील, डॉ.के.एन. पाटील, डॉ. आनंद गुरव, नवनाथ पोवार, देवराज नरके, राजवीर नरके यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कुंभी कासारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, कुंभी बँकेचे सर्व संचालक, करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातीत विविध संस्थांने पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      नौका पार करतोय…..!
माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, “आमचं ठरलंय….,” “आपलं ठरलय….,” हे मी ऐकतच आलोय. पण माझ्या बाबतीत असं काय घडतंय ? लोकांचं ठरतय, आणि त्यांचा आशिर्वाद मिळाला की मी नौका पार करतोय. एकट्यानं लढायचं हेच शिकलोय.

           रोष पत्करून……!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, स्व. सदाशिव मंडलिक यांनी गैबी बोगदा तयार करून भोगावती नदीत नऊ टीएमसी पाणी सोडलं. हे करत असताना त्यांना कागलमधील विरोधकांचा रोष पत्करावा लागला. त्यावेळी त्यांना ‘ कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ‘ अशी उपमा देण्यात आली. परंतु; कै. मंडलिक यांनी कोल्हापूर व करवीरचा विचार करून बोगदा काम पूर्णत्वास नेले. यासाठी त्यांनी कागलमधील काही विरोधकांचा रोष पत्करला. कोल्हापूर व करवीरसाठी त्यांनी नऊ टीएमसी पाण्याची केलेली सोय जनता कधीच विसरणार नाही.

        स्वागत व प्रास्ताविक गोकुळचे संचालक व कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *