बातमी

मुरगूड येथील समाजवादी प्रबोधिनीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यानां विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता कागल येथिल समाजवादी प्रबोधिनी शाखेत आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्य डी डी चौगले यांच्या हस्ते फोटो पूजन व पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलतानां डी डी चौगले सर म्हणाले भारताची अर्थव्यवस्था मजबूत करून देशाला महासत्तेच्या वाटेवर नेण्यासाठी डॉआंबेडकरांचे विचार मार्गदर्शक आहेत . त्यांच्या अर्थविषयक विचारानी भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल.

या अभिवादन प्रसंगी भिकाजी कांबळे, मोहन कांबळे, रणजीत कदम, भरत साळुंखे, विक्रम कांबळे, वसंत सोनुले, बबन बारदेस्कर, मनू कांबळे, बंडा कांबळे, विष्णू कांबळे , निलेश खरात आरोग्य विभागाचे कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *