बातमी

वसुलीचे निरंक उद्दीष्टपूर्तीबद्दल मुरगूड विभाग वीज कर्मचाऱ्यांचा गुणगौरव !

वीज ग्राहक व  वीज कर्मचाऱ्यांत समन्वय हवा – हेमंत येडगे

मुरगूड ( शशी दरेकर ) : वीज ही अत्यावश्यक सेवा आहे . ही सेवा देण्यासाठी वीज कामगारांचे  योगदान महत्वाचे आहे . वीज ग्राहकांनी सुध्दा सेवेला प्रतिसाद दयायला हवा . वीज ग्राहक व वीज कर्मचारी यांच्यात समन्वयाची भूमिका हवी असे प्रतिपादन वीज महावितरणच्या मुरगूड  विभागाचे कार्यकारी  अभियंता हेमंत येडगे यांनी केले.     

              वीज महावितरण कंपनीच्या  मुरगूड विभागाने चालू आर्थिक वर्षात वीज बीलं थकबाकी वसुलीचे निरंक उद्दीष्टपूर्ती केल्याबद्दल वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देवून  गुणगौरव करण्यात आला . याप्रसंगी श्री येडगे बोलत होते. यावेळी कोल्हापूर विभागाचे व्यवस्थापक उत्तम लांडगे प्रमुख उपस्थित होते.

      या प्रसंगी बोलताना  पत्रकार प्रा . सुनिल डेळेकर म्हणाले ,  मुरगूड विभागाला गुणी व जिद्दी वीज कर्मचारी व अधिकारी  मिळाल्यामूळे वीज पुरवठ्याची सेवा चांगली मिळत आहे  या विभागातील  २८ कोटीची वीज बील वसुली  करून  निरंकचे उद्दीष्ट पूर्ण केले व जिल्हयात या विभागाचा सन्मान वाढला ही कौतुकास्पद बाब आहे.

           याप्रसंगी बोलताना पत्रकार मधुकर भोसले म्हणाले ‘ _   वीज कर्मचारी आणि समाजाचं वेगळं नातं आहे . हे नाते जोपासत जीव धोक्यात घालून कर्मचारी व अधिकारी बांधव  सेवा देतात. हा त्यांच्या सेवेचा गौरव आहे.                                                            

  यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश तिराळे यांनीही कृतज्ञता व्यक्त करुन वीज महावितरणच्या मुरगूड विभागाचे कौतुक केले .
          याप्रसंगी बिलिंग विभागाचे अकौंटंट कृष्णात डोणे .वीज लाईनमन समाधान मोरबाळे यांनी मनोगत व्यक्त केले .
              वीज महावितरण कंपनीच्या मुरगूड विभागातील सर्व अधिकारी वर्ग व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी  देवून गौरव करण्यात आला .          

                   

                या कार्यक्रमास मुरगूड ग्रामीणचे सहाय्यक अभियंता अमोल बिराजदार , सोनगे उपविभागाचे सहाय्यक अभियंता संतोष सरोळे ‘ कापशी उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत करनूरकर , कनिष्ठ अभियंता संग्रामसिंह घोरपडे , लिंगनूर उपविभागाचे कनिष्ठ अभियंता सुदेश जाधव ‘  पत्रकार अनिल पाटील ,महादेव कानकेकर, ‘दिलीप निकम ,’ शशी दरेकर ,राजू चव्हाण ‘ ओंकार पोतदार ,  व मुरगूड विभागीय सर्व वीज कर्मचारी वर्ग उपस्थित होता .

       स्वागत व प्रास्ताविक मुरगूड शहरचे सहाय्यक अभियंता प्रकाश पाटील यांनी केले तर कृष्णात डोणे यांनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *