मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल शिवतीर्थ जवळील असणाऱ्या रस्त्याच्या कामा संदर्भात मध्यंतरी नागरीकानी रस्ता रोको आंदोलन करुन सदर रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत असल्याकारणाने मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. संदीप घार्गे यानां रस्ता सुव्यवस्थित व्हावा यासाठी निवेदन दिले होते.
सदर निवेदन स्विकारून २५ जानेवारी अगोदर रस्त्याच्या कामास प्रारंभ करु या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले होते. सदर रस्ता सुव्यवस्थित करण्याचा प्रारंभ गुरुवार दि. १८/ १ /२४ पासून सुरु करण्यात आला. मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यानीं_नागरीकानां आश्वासन दिल्याप्रमाणे व रस्त्याच्या कामाची सुरुवात केल्याने नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे.