मुरगूड ( शशी दरेकर ) : मा.दगडू शेणवी युवा मंच दौलतवाडी यांच्यावतीने श्रीमंत राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त दौलतवाडी विद्या मंदिर येथील शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास गुरव होते .
प्रमुख उपस्थिती संजय चौगले व दौवलतवाडीच्या सरपंच शितल जाधव ह्या होत्या. तर कार्यक्रमाचे संयोजक मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी हे होते.
यावेळी अनंत फर्नांडिस,संजय चौगुले, विजय राजिगरे, अमर चौगले, राजेंद्र चव्हाण, प्रविण चौगुले, प्रशांत कुडवे, जयवंत पाटील, बाजीराव जाधव संदिप जाधव , सुनिल जाधव, विनोद जाधव आदी उपस्थित होते. स्वागत सुरज मुसळे यानीं केले.
प्रस्ताविक मुख्याध्यापक उत्तम पाटील यांनी केले .
यावेळी दतामामा खराडे, दगडू शेणवी, उत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन जगदीश कांबळे सर यांनी तर
आभार विशाल कांबळे यांनी मांडले.