बातमी

हुपरी येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीची यात्रा १३ फेब्रुवारी

हुपरी : हुपरी येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीची यात्रा दि. १३ त १५ फेब्रुवारी यात आहे. त्यानिमित्त अनेक धार्मिक, सांस्कृतिक, विविध स्पर्धा व निकली कुस्त्यांचे जंगी मैदान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

यात्रेत दि. १३ रोजी पहिली पालखी पहाटे ४ वाजता, दुसरी पालखी दुपारी ४ वाजता, तर तिसरी पालखी रात्री ९ वाजता निघेल. दि. १४ रोजी चौथी पालखी व भरयात्रा असे कार्यक्रम होतो. तसेच १६ वर्षाखालील महिला पुरुष गटात एअरगन नेमबाजी स्पर्धा व त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल. रात्री वाजता लोककलेचा शिलेदार अस्सल शाहिरी कार्यक्रम होणार आहे. दि. १५ रोजी दुपारी ३ वाजता कुस्त्यांचे मैदान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *