ताज्या घडामोडी बातमी

एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन – आमदार हसन मुश्रीफ

आमदार हसन मुश्रीफ यांचे किरीट सोमय्या यांना प्रतीआव्हान

कागल : भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर आता हसन मुश्रीफ यांनी पलटवार करत आरोप खोडून काढले आहेत.

सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. माझ्या बदनामीसाठी षड्यंत्र रचलं जात असून यामागचा बोलवता धनी लवकरच उघड करू, अशा इशाराही त्यांनी दिला.

सोमय्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे संचालक यांना किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवणार असल्याचेही ते म्हणाले. राज्य सरकारकडून 39 हजार शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम ठेव म्हणून ठेवली. त्या रकमेवर आमदार मुश्रीफ यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला 40 कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप केला आहे.

कर्जासाठी दिलेल्या रकमेचा एकही कागद नाही. ठेवीच्या बदल्यात कर्ज दिल्याचे म्हटलेलं नाही. शेतकऱ्यांच्या नावाने शेतकऱ्यांचे शोषण केले जात आहे. ताबडतोब विशेष लेखापरीक्षण करून संचालक मंडळ बरखास्त करावे व सहकार आयुक्तांनी या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *