मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता. कागल येथील प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिरातील श्रीमूर्ती च्या मागे तिरंगी प्रभावळ करून यावर्षी मंदिराच्या प्रशासनाने अमृतमहोत्सवी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला.
अनेक विधायक उपक्रम करणाऱ्या येथील ओम साई तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुवर्ण गणेश मंदिराची नुकतीच उभारणी केली. यावर्षी मंडळाने अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंदिरातील सुवर्ण गणेश मूर्तीच्या मागे आकर्षक पद्धतीने तिरंगी प्रभावळ करून अनोख्या पद्धतीने देशप्रेम जागे केले.